पुण्यात समाजकल्याण केंद्र संचालकांकडून मुलींचा विनयभंग
By Admin | Updated: August 23, 2014 00:32 IST2014-08-23T00:32:16+5:302014-08-23T00:32:16+5:30
शिवाजीनगर येथील समाजकल्याण केंद्राच्या केजी स्कूलमध्ये बारा-तेरा वर्षाच्या चार मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी केंद्राच्या संचालकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
पुण्यात समाजकल्याण केंद्र संचालकांकडून मुलींचा विनयभंग
पुणो : शिवाजीनगर येथील समाजकल्याण केंद्राच्या केजी स्कूलमध्ये बारा-तेरा वर्षाच्या चार मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी केंद्राच्या संचालकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने आरोपीला 27 ऑगस्टपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दीपक गायकवाड (3क्) असे आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगर परिसरात तो एक खासगी ट्रस्ट चालवतो. सकाळच्या सत्रत तेथे केजी शाळा चालविली जाते व दुपारी परिसरातील महिलांसाठी शिवण क्लास घेतले जातात.
15 ऑगस्टला गायकवाड याने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले असल्याची बतावणी करून चार मुलींना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांचा विनयभंग केला व त्यांना अश्लिल चित्रे- व्हिडिओ दाखविला. 19 ऑगस्ट रोजी जेव्हा यातील एका मुलीने शेजारच्यांना हा प्रकार सांगितला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. तिने याबाबत आईलाही सांगितले. यानंतर त्यांनी इतर तिघींकडे चौकशी केली असता त्यांनी त्यास दुजोरा दिला. (प्रतिनिधी)