नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारकात युवतीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 21:58 IST2017-09-30T21:56:53+5:302017-09-30T21:58:26+5:30

नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारकात युवतीचा विनयभंग
नाशिक : वैयक्तिक मुलाखतीच्या बहाण्याने पंचवीस वर्षीय तरुणीस कुसुमाग्रज स्मारकातील (प्रतिष्ठान) कक्षामध्ये बोलावून घेत तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि़२९) रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली़
सिडकोच्या श्रीरामनगर परिसरातील पीडित युवतीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रोहित अशोक आर्या (४२, रा़सरदार पटेल पुतळ्याजवळ, वल्लभ विद्यानगर, आनंद, गुजरात) यांनी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास वैयक्तिक मुलाखत घ्यायच्या उद्देशाने कक्षामध्ये बोलावून घेत तिचा विनयभंग केला़
या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित आर्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़