मोहरम मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी एकाला शिक्षा
By Admin | Updated: April 27, 2016 15:35 IST2016-04-27T15:35:38+5:302016-04-27T15:35:38+5:30
२०१३च्या मोहरम मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजेचे मालक अल्ताफ अजमखान (रा़नगर) याला नगरच्या प्रथम वर्ग न्यायालयाचे

मोहरम मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी एकाला शिक्षा
अहमदनगर, दि.२७ - २०१३च्या मोहरम मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजेचे मालक अल्ताफ अजमखान (रा़नगर) याला नगरच्या प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश एम़ एस़ तोडकर यांनी एक महिना कैद आणि पाच हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे़
डीजे वाजविल्याप्रकरणी ही महाराष्ट्रीतील पहिल्याच शिक्षा आहे़ सरकारी अभियोक्ता अॅड़ सचिन सुर्यवंशी यांनी या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली़ तत्कालिन पोलीस अधीक्षक आऱ डी़ शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती़