मोहाची झाडे ठरत आहेत आदिवासींसाठी कल्पवृक्ष
By Admin | Updated: April 28, 2016 03:58 IST2016-04-28T03:58:47+5:302016-04-28T03:58:47+5:30
मोहाचे फलदायी वृक्ष गोरगरिब आदिवासी कुंटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे़ बहुतांश शेतकरी, शेतमजूर शेतीपूरक व्यवसायावर जास्त अवलंबून असतात.

मोहाची झाडे ठरत आहेत आदिवासींसाठी कल्पवृक्ष
राहुल वाडेकर,
तलवाडा/विक्रमगड- तलवाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगले, औषधी वनस्पती, रानभाज्या तर मोहाचे फलदायी वृक्ष गोरगरिब आदिवासी कुंटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे़ बहुतांश शेतकरी, शेतमजूर शेतीपूरक व्यवसायावर जास्त अवलंबून असतात. आदिवासीसाठी फलदायी व उदनिर्वाहाचे साधन बनले आहे ते मोहाचे झाड़
ग्रामीण भागात आंब्यांच्या झाडानंतर दुसरा क्रमांक मोहाच्या झाडाचा लागतो़ या झाडापासुन शेतकऱ्याला लाकूड तर मिळतेच पण पावसाळयात नविन फुटलेली पालवी उन्हाच्या तीव्र उष्णतेने सुकून जाते़ व गळून पडते त्याचेच पुढे खत होते. प्रसंगी राबासाठी हा पाचोळा वापरला जातो.
शेतकरी खरीप हंगामाकरीता शेतीची राबणी करण्यासाठी जंगलातील पाला-पाचोळा गोळा करुन शेतात भाजतात़ त्यापासुन शेतात पेरलेल्या भाताच्या रोपटयाला उपयुक्त खत मिळते़ या झाडाला पिवळया रंगाची फुले येतात़ उष्णता लागली की ती फुले खाली पडतात़ ही फुले आदिवासी सकाळ, दुपारपर्यतच्या वेळेत वेचुन उन्हात सुकवतात़ कालातंराने ही फुले ४० ते ५० रुपये किलोने विकतात. त्यांचा वापर मद्यनिर्मितीसाठी केला जातो़ ती माफक प्रमाणात घेतल्यास औषधी ठरते, असा आदिवासींचा समज आहे.
मोहाच्या झाडाला फळे येतात. या भागात त्यांना दोडें (मोहटया) म्हणून संबोधतात़ काही वेळेस कवळया दोडयापासुन स्वादिष्ट भाजी होते .
>४आदिवासी दिवसभर २ ते ३ टोपल्या फळे जमा करतो़ बिया फोडतो. यामधून दोन दले मिळतात़ त्यास आदिवासी लोक डाळिंब संबोधतात़ ती सुकवितात़ मोसमात एक व्यक्ती एक क्विंटलच्या आसपास ही दले गोळा करते. ती तेलाच्या कारखान्यात नेतात़ त्यापासून किमान ५० ते ६० किलो खाद्यतेल मिळते़
>४सुरुवातीला तेलाला तीव्र उष्णतेत कढवावे लागते़ त्यात नागलीच्या पिठाची छोटी भाकर टाकली जाते़ परिणामी त्यापासून तेलातील मळ व कडूपणा नष्ट होऊन ते खाण्यालायक होते तर कच्च्या तेलात भिजलेला रुमाल मुलांना थंडी ताप आल्यास त्यांच्या कपाळावर ठेवतात़