मुंबईबाबत मुख्यमंत्र्यांवर पंतप्रधान मोदींची नाराजी
By Admin | Updated: December 20, 2014 03:08 IST2014-12-20T03:08:35+5:302014-12-20T03:08:35+5:30
मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
_ns.jpg)
मुंबईबाबत मुख्यमंत्र्यांवर पंतप्रधान मोदींची नाराजी
अतुल कुलकर्णी, नागपूर
मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर मोदींनी मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रानंतर ही नाराजी व्यक्त झाली आहे.
मुंबईच्या एकात्मिक विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याची शिफारस आपण केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील दिल्ली भेटीनंतर पत्रकारांना दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला राजकीय आणि सामाजिक स्तरांतून तीव्र विरोध झाला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. त्या पत्रात पवारांनी अनेक घटनात्मक मुद्दे उपस्थित करीत राज्य सरकार मुंबईचा विकास करू शकत नाही का, असा चिमटाही काढला होता. पवारांचे ते पत्र माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू, नितीन गडकरी, गृहमंत्री राजनाथसिंह, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आदींसह अनेक प्रमुख मंत्र्यांपर्यंत पोहोचविले.