मोदी सरकारमुळे देश पुन्हा परावलंबी?

By Admin | Updated: September 2, 2014 23:30 IST2014-09-02T23:30:51+5:302014-09-02T23:30:51+5:30

देश पुन्हा परावलंबी होण्याची भीती असल्याचे मत सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांनी येथे व्यक्त केले.

Modi's government is again dependent on the country? | मोदी सरकारमुळे देश पुन्हा परावलंबी?

मोदी सरकारमुळे देश पुन्हा परावलंबी?

डोंबिवली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 1क्क् दिवस पूर्ण झाले असून त्यांनी या काळात जे निर्णय घेतले, त्यामुळे देश पुन्हा परावलंबी होण्याची भीती असल्याचे मत  सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांनी येथे व्यक्त केले.
 येथील मॉडेल महाविद्यालयात रौप्य महोत्सव वर्षानिमित्त ‘विकास योजना-आर्थिक फायदा व पर्यावरणाचा :हास’ या विषयावरील व्याख्यानानंतर त्या पत्नकारांशी बोलत होत्या. 
पाटकर पुढे म्हणाल्या, मोदी सरकारने गेल्या 1क्क् दिवसांत जे निर्णय घेतले ते धक्कादायक असून देशात चर्चा न करता इतर देशांबरोबर करार केले आहेत. बुलेट ट्रेनचा उपयोग कुणाला होणार? त्यापेक्षा पायवाटा, रस्ते करायला प्राधान्य द्यायला हवे, असेही त्या म्हणाल्या़ आगामी विधानसभा निवडणूकच नव्हे तर निवडणुकीच्या राजकारणातून मी बाजूला झाले आहे.  (प्रतिनिधी)
 
आप पार्टीने महाराष्ट्रातील  विधानसभेच्या निवडणुकीत थोडय़ा जागा लढवायला हव्या होत्या. पार्टीने केवळ  निवडणूक ते निवडणूक एवढेच काम करू नये असा टोलाही लगावला. 

 

Web Title: Modi's government is again dependent on the country?