मोदींचा विजयाचा डबल धमाका
By Admin | Updated: May 16, 2014 11:43 IST2014-05-16T11:43:42+5:302014-05-16T11:43:42+5:30
अरविंद केजरीवाल यांचा दणदणीत पराभव करीत विजय मिळविला असून विजयाचा डबल धमाका उडवून दिला आहे.

मोदींचा विजयाचा डबल धमाका
>ऑनलाइन टीम
वाराणसी , दि. १६ - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले असून वडोदरा येथे मोदींनी तब्बल चार लाख मतांनी दिमाखदार विजय मिळवला आहे. तसेच प्रतिष्ठेची समजल्या जाणा-या वाराणसीच्या जागेवर नरेंद्र मोदी यांनी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा दणदणीत पराभव करीत विजय मिळविला असून विजयाचा डबल धमाका उडवून दिला आहे. मोदी यांच्या या दुहेरी विजयाने देशात मोदी लाट असल्याचे सिध्द करून दाखवले आहे.
नरेंद्र मोदी हे गुजरातमधील वडोदरा आणि उत्तरप्रदेशमधील वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवत आहे. गुजरात हा मोदींचा गड असल्याने वडोदरा येथे मोदीच विजयी होतील अशी दाट शक्यता होती. पण ते किती मताधिक्याने विजयी होतील याकडे सर्वांचे लक्ष होते. सकाळी मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यापासूनच वडोद-यात मोदींनी आघाडी घेतली होती. अवघ्या तीन तासांतच वडोद-याची मतमोजणी संपली. यात मोदींनी चार लाख मतांनी दिमाखदार विजय मिळवत गुजरातमधील त्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले. विशेष म्हणजे वडोद-यात उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या रोड शोव्यतिरिक्त मोदी वडोद-यात प्रचारासाठी फिरकलेही नव्हते.