मोदींचे वर्तन गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे
By Admin | Updated: October 12, 2014 02:45 IST2014-10-12T02:45:37+5:302014-10-12T02:45:37+5:30
नरेंद्र मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखेच बोलत आणि वागत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय वित्त मंत्री पी.चिदंबरम यांनी आज येथे केली.

मोदींचे वर्तन गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे
>मुंबई : नरेंद्र मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखेच बोलत आणि वागत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय वित्त मंत्री पी.चिदंबरम यांनी आज येथे केली.
पत्रकारांशी बोलताना चिदंबरम म्हणाले की, मोदी पंतप्रधान झाले तरी त्यांना देशाच्या नेतृत्वाचा
आवाका आलेला दिसत नाही. पंतप्रधान होऊनदेखील मोदी अजून गुजरातमध्येच गुंतलेले दिसतात. गुजरात महाराष्ट्रापेक्षा पुढे
असल्याचे सांगितले जाते पण त्याला पुष्टी मिळेल, अशी कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. उलट महाराष्ट्रच गुजरातच्या पुढे आहे.
महाराष्ट्र उद्योगात नंबर वन आहे. परकीय व देशांतर्गत गुंतवणुकीत अव्वल असताना महाराष्ट्रात गेल्या काही वर्षामध्ये काहीही झालेले नाही, हे मोदी यांचे वक्तव्य महाराष्ट्राचा अवमान करणारे आहे. महाराष्ट्रात येऊन गुजरात मॉडेल विकण्याचा प्रकार दुर्देवी आहे, अशी
टीकाही चिदंबरम यांनी केली.
(विशेष प्रतिनिधी)
1युपीए सरकारच्या योजनांचे मोदी सरकार श्रेय घेत आहे. आमच्या सरकारमध्ये निर्मल भारत अभियान आधीपासून होतेच. त्याला आता स्वच्छ भारत अभियान नाव दिले आहे.
2शून्य बँक बॅलन्सचे खाते उघडण्याची योजना आम्ही सुरू केली होती. त्यालाच आता ‘पंतप्रधान जन धन योजना’ असे नाव देण्यात आले आहे. कौशल्य विकासाच्या आमच्या योजनेला नवे नाव देण्यात आले. नव्या सरकारने योजना आयोग गुंडाळला.
3अर्धा डझन राष्ट्रीयकृत बँकांचे अध्यक्षपद रिक्त आहे. मुख्य माहिती आयुक्तांचे पदही रिक्त आहे. सरकारमध्ये स्वतंत्र वित्त सल्लागार नाहीत. हे सगळे सुप्रशासनाचे लक्षण नाही, याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले.