मोदींचे वर्तन गांधी विचारांच्या विरोधात!
By Admin | Updated: October 13, 2014 00:43 IST2014-10-13T00:43:21+5:302014-10-13T00:43:21+5:30
बुलडाण्याच्या सभेत राहुल गांधी यांची घणाघाती टिका.

मोदींचे वर्तन गांधी विचारांच्या विरोधात!
बुलडाणा : महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्यासमोर नतमस्तक व्हायचे, न्युयॉर्कमधील पुतळ्याप्रमाणे सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याची घोषणा करायची आणि प्रत्यक्षात या थोर नेत्यांच्या विचारांच्या विसंगत कृती करायची, हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण असल्याची घणाघाती टिका काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी रविवारी बुलडाण्यातील जाहीर सभेत केली.
बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिराच्या प्रांगणात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. सभेला उपस्थित जनसमुदायास मराठीत ह्यनमस्कारह्ण करून, भाषणाला प्रारंभ करणार्या राहुल गांधी यांनी भाजपवर सडेतोड टीका केली. महात्मा गांधी, सरदार पटेल यांनी लोककल्याणाचा विचार दिला. जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. नरेंद्र मोदी हे लोकांसमोर महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांना आदर्श मानतात; मात्र प्रत्यक्षात या दोघांच्या विचारांची हत्या करणारी कृती करतात. गांधी, पटेलांच्या त्याच विचारधारेवर काँग्रेस पक्ष उभा राहीला आणि त्याच विचाराने सरकार चालविले. म्हणूनच काँग्रेसच्या सरकारमध्ये सामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू राहिला आहे. महाराष्ट्र ही शाहू, फुले, आंबेडकर यांची भूमी आहे. त्यांनी दिलेला विचार हा शाश्वत विचार असून, तोच काँग्रेसचा आत्मा आहे. त्यामुळे काँग्रेस संपविण्याची भाषा करणारे हा विचार संपविण्यास उद्युक्त करतात; मात्र हा विचार संपविण्याची ताकद मोदींमध्ये नाही, अशी टिका त्यांनी केली. काँग्रेसने जनसामान्यांना ६00 प्रकारची औषधं मोफत दिली, शस्त्रक्रिया मोफत केल्या. मोदी सरकारने मात्र अमेरिकी कंपन्यांशी हातमिळवणी करून, १0८ औषधांचे भाव वाढवले. ८ हजाराचे औषध १ लाख रूपयांचे केले. सोयाबिनचा भाव कमी केला. काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या मनरेगा, अन्न सुरक्षा, शिक्षण अधिकार, जमिन अधिग्रहण अशा चांगल्या योजना आता बंद करण्याचे षडयंत्र रचले जात असून, सामान्यांच्या खिशात जाणारा पैसा आता उद्योगपती आणि कंत्राटदारांच्या खिशात जात असल्याची टिका त्यांनी केली.
*कहाँ गये अच्छे दिन?
आमचे सरकार आल्यानंतर ह्यअच्छे दिनह्ण येतील, चिन घाबरेल, पाकीस्तान शरण येईल, अशा वल्गना भाजपने केल्या होत्या. प्रत्यक्षात चिनच्या राष्ट्रपतींसोबत मोदी झोपाळयावर झोके घेत होते, तेव्हा लद्दाखमध्ये चिनचे सैन्य घुसले. सीमेवर पाकीस्तानचा गोळीबार सुरूच आहे. अशा परिस्थितीत अच्छे दिन कब आयेंगे या प्रश्नावर, जल्द ही सब ठिक हो जायेंगा हे भाजपचे उत्तर असल्याचे, राहुल गांधी म्हणाले.