मोदींमुळे देशातील शेती अर्थव्यवस्था अडचणीत - शरद पवार
By Admin | Updated: October 9, 2014 13:58 IST2014-10-09T13:58:56+5:302014-10-09T13:58:56+5:30
नरेंद्र मोदींमुळे शेतीची अर्थव्यवस्था अडचणीत आली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला

मोदींमुळे देशातील शेती अर्थव्यवस्था अडचणीत - शरद पवार
>बुलडाणा, दि. ९ - नरेंद्र मोदींनी सत्तेवर येताच डाळींब, कांदा व धान्य निर्यातीवर बंदी आणली यामुळे शेतक-यांच्या उत्पादनाचे भाव गडगडले, विदेशी बाजार पेठ बंद झाली त्यामुळे शेतीची अर्थव्यवस्था अडचणीत आली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सिंदखेडराजा येथील सभेत ते बोलत होतेय
गुजरातमध्ये शालेय स्तरावर असलेल्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांचे नाव दादोजी कोंडदेव असे छापले आहे. ज्या मोदींना छत्रपतींचा इतिहास माहित नाही ते आता जाहिरातींमधून मतांसाठी छत्रपतींचा आधार घेतात अशी टीकाही पवार यांनी केली.