मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे?

By Admin | Updated: October 6, 2014 05:42 IST2014-10-06T05:42:59+5:302014-10-06T05:42:59+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा सवाल करतानाच मोदी पंतप्रधान झाले तरी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत

Modi is the Prime Minister of Gujarat or Gujarat? | मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे?

मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा सवाल करतानाच मोदी पंतप्रधान झाले तरी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत, अशी थेट टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
भांडुप येथील प्रचार सभेत ते म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भेटले तेव्हा मोदींना ‘केम छो’ म्हणाले. व्हाइट हाऊससमोर सांस्कृतिक कार्यक्रम झाला, तोही गरब्याचा. देशात बुलेट ट्रेन सुरू करायची झाली तर मुंबई-दिल्ली किंवा कोलकाता अशी न करता अहमदाबादपर्यंत का केली जाते, हे काय सुरू आहे, यांचे छुपे अजेंडे कुठले आहेत, असे सवाल राज यांनी केले. केंद्राची मदत हवी असल्यास राज्यात भाजपाचे सरकार आणा, असे मोदी सांगत आहेत. जर राज ठाकरेंचे सरकार आले तर तुम्ही मदत करणार की नाही, असेही त्यांनी मोदींना विचारले. केंद्रात काँग्रेस सरकार असतानाही गुजरातला मदत केली, हे मोदी विसरले का? (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Modi is the Prime Minister of Gujarat or Gujarat?