मोदींनी पुण्यातल्या 'त्या' चिमुकलीची भेट घेतली
By Admin | Updated: June 25, 2016 19:20 IST2016-06-25T16:17:31+5:302016-06-25T19:20:46+5:30
हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवत मदत मिळवणारी हडपसर येथील चिमुकली वैशाली यादव (वय 6) हिची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली आहे

मोदींनी पुण्यातल्या 'त्या' चिमुकलीची भेट घेतली
>
![]()
पुणे, दि. 25 : हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवत मदत मिळवणारी हडपसर येथील चिमुकली वैशाली यादव (वय 6) हिची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली आहे. मोदींच्या भेटीसाठी वैशाली बालेवाडी येथील स्मार्टसिटी प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमस्थळी उपस्थित होती. वैशाली यादव हिची मोदींनी भेट घेत आस्थेवाईकपणे चौकशी करून भेट वस्तूही दिल्या.
महिन्याभरापुर्वी तिच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिच्या शस्त्रक्रियेसाठी तीन लाखांची आवश्यकता होती. परंतु, हलाखिच्या परिस्थितीमुळे शस्त्रक्रियेचा खर्च भागवण्यासाठी तिची खेळणी आणि सायकलही विकायची वेळ तिच्या कुटुंबावर आली होती.
त्यानंतर तिने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून ‘मोदी सरकार मला मदत पाहिजे.’ कळवले होते. पंतप्रधान कार्यालयाने याची तातडीने दखल घेत पुणे जिल्हा प्रशासनास वैशालीचा शोध घ्यायला लावून तिला मदत उपलब्ध करुन दिली. पुण्यातील एका पंचतारांकित रुग्णालयात तिच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.