शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मोदी मॅजिक, ईव्हीएम आणि इंडिया आघाडी; निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 14:57 IST

विधानसभा निवडणूक निकालाचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया या आघाडीवरही परिणाम होणार का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये आज मतमोजणी सुरू आहे. यातील राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. या राज्यांमध्ये काँग्रेसकडून भाजपला कडवी झुंज दिली जाईल, अशी आशा देशभरातील विरोधी पक्षांना होती. मात्र विरोधकांची ही आशा फोल ठरली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या निकालाचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया या आघाडीवरही परिणाम होणार का, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. तसंच निवडणूक निकालावरही भाष्य केलं आहे.

"आजचा निवडणूक निकाल भाजपच्या बाजूने झुकत असल्याचं आतापर्यंतच्या कलांवरून दिसत आहे," असं शरद पवार म्हणाले. तसंच या निकालाचा इंडिया आघाडीवर परिणाम होईल का, या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, "विधानसभा निवडणूक निकालांचा इंडिया आघाडीवर काही विपरित परिमाण होईल, असं मला वाटत नाही. आम्ही मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक घेणार आहोत. या बैठकीत निकालाचं विश्लेषण केलं जाईल. तज्ज्ञांकडून या निकालाचे बारकावे जाणून घेतले जातील आणि त्यानंतरही याबाबत आम्ही आमचं मत मांडू."

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!

विधानसभा निवडणुकांबाबत पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की, "मी निवडणुकांदरम्यान या राज्यांमध्ये गेलो नसल्याने तिथं नेमकी काय स्थिती होती, याची कल्पना नाही. मंगळवारी आमची दिल्लीत बैठक झाल्यानंतरच याबाबत आणखी स्पष्टपणे बोलताना येईल."

ईव्हीएम आणि मोदी मॅजिकबद्दल काय म्हणाले शरद पवार?

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "निकालापूर्वी काही लोकांनी आमच्याकडे ईव्हीएमबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र याबाबत माझ्याकडे कोणतीही खात्रीशीर माहिती नाही. अशा स्थितीत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी काही मत व्यक्त करणं, योग्य नाही," असं पवार म्हणाले. भाजपच्या विजयामुळे पंतप्रधान मोदी यांची जादू अद्याप कायम असल्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले की, "अद्याप मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच आपण यावर मत तयार करू शकतो. त्यासाठी ६ वाजेपर्यंत वाट पाहावी लागले." 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा