वीज संकटाला मोदी सरकार जबाबदार

By Admin | Updated: September 2, 2014 03:20 IST2014-09-02T03:20:39+5:302014-09-02T03:20:39+5:30

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे महाराष्ट्रातील वीज संकटासाठी जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.

The Modi government is responsible for the power crisis | वीज संकटाला मोदी सरकार जबाबदार

वीज संकटाला मोदी सरकार जबाबदार

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे महाराष्ट्रातील वीज संकटासाठी जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ आज हुतात्मा चौकापासून झाला. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.  भाजपा-शिवसेनेसारख्या जातीयवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखण्याचे आवाहन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी या वेळी केले. 
 54 मशाली पेटवून त्या जिल्ह्याजिल्ह्यात रवाना करण्यात आल्या. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणो, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आदी नेते, काँग्रेसचे मंत्री, अ. भा. काँग्रेसचे सहप्रभारी बालाराम बच्चन, श्योराज जीवन वाल्मिकी, पक्षाचे आमदार, खासदार आणि जिल्ह्याजिल्ह्यातून आलेले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील वीज संकट दूर करण्याबाबत केंद्र सरकार गंभीर नाही. गणोशोत्सवाच्या काळात वीज भारनियमन सुरू करावे लागेल, अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे केंद्रात ऊर्जामंत्री असताना वीज संकट दूर करण्याची केंद्राची भूमिका होती. वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा मिळावा, याची दक्षता घेतली जायची. आता केंद्र सरकारने याबाबत लक्ष घातले नाहीतर महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील अनेक राज्यांसमोर विजेचे संकट उभे ठाकेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
आपण ऊर्जामंत्री असताना विविध राज्यांशी समन्वय साधून वीज उत्पादनावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेत होतो, असे ते शिंदे यांनी या वेळी सांगितले. संयुक्त महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या हुतात्मा स्मारकापासून प्रचाराला प्रारंभ करून काँग्रेसने विदर्भवाद्यांना सूचक इशारा दिला. ‘काँग्रेस राज्याच्या विभाजनाच्या बाजूने नाही. आम्ही महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे काँग्रेसच्या विधानसभा प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणो म्हणाले. 
साईबाबा हे देशातील कोटय़वधी जनतेचे श्रद्धास्थान आहेत पण त्यांच्याविषयी वाद निर्माण करणा:या प्रवृत्तींपासून सावध राहा. राज्य जातीयवाद्यांच्या हातात जाणार 
नाही याची दक्षता घ्या, असे 
आवाहन अशोक चव्हाण यांनी 
केले. आघाडीच्या मुद्दय़ावर गोंधळ निर्माण करू नका. आम्हाला 
आघाडी हवी आहे पण आम्हाला फार काळ ताटकळत ठेवू नका, असा इशारा माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.  
(विशेष प्रतिनिधी)
 
मोदी सरकार महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देत आहे. भाजपावाले महाराष्ट्र सरकारला त्रस देण्याची भूमिका घेत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली.
 
मुंबईत हुतात्मा स्मारकासमोर मशाल प्रज्वलित करून प्रदेश काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराचा सोमवारी प्रारंभ केला. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणो आदी.

 

Web Title: The Modi government is responsible for the power crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.