मोदी सरकारने पाकचे शेपूट पिळले - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: January 2, 2015 09:57 IST2015-01-02T09:50:37+5:302015-01-02T09:57:34+5:30
केंद्रावर आलेल्या मोदी सरकारने पाकिस्तानचे शेपूट पिळल्याने पाकने भारतासमोर शरणागती पत्कारली असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या कामाची स्तुती केली आहे.

मोदी सरकारने पाकचे शेपूट पिळले - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - केंद्रावर आलेल्या मोदी सरकारने पाकिस्तानचे शेपूट पिळल्याने पाकने भारतासमोर शरणागती पत्कारली असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या कामाची स्तुती केली आहे.
सीमा रेषेवर पाककडून होणा-या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखामध्ये भाष्य केले. भारताबाबत पाकचे शेपूट नेहमीच वाकडे राहिले आहे. यापूर्वीच्या सत्ताधा-यांनी शेपूट सरळ करण्याचा दिखावा केला. पण विद्यमान मोदी सरकारचे शेपूट पिळत त्यांना वठणीवर आणले. सांबा सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिल्याने पाकने पांढरा झेंडा फडकावत भारतासमोर शरणागती स्वीकारली असे ठाकरेंनी म्हटले आहे.