शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने राज्याला दिले १०.५० लाख कोटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला लेखाजोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:44 IST

Devendra Fadnavis: काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने महाराष्ट्राला १० वर्षांत १ लाख २३ हजार कोटी रुपये दिले, तर नरेंद्र मोदी सरकारने १० वर्षांत त्याच्या दहापट म्हणजे १० लाख ५० हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य दिले, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई - काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने महाराष्ट्राला १० वर्षांत १ लाख २३ हजार कोटी रुपये दिले, तर नरेंद्र मोदी सरकारने १० वर्षांत त्याच्या दहापट म्हणजे १० लाख ५० हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य दिले, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाला फाटा देऊन मोदी यांनी विकास, संशोधन आणि सर्वसमावेशकता आणली. संकल्पांपासून सिद्धीकडे जाताना त्यांनी पारदर्शक, प्रामाणिक, गतिशील आणि निर्णयक्षम सरकार दिले.

रेल्वेचे पावणेदोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. दहा वर्षांत रेल्वे खात्याने दिला नाही एवढा निधी महाराष्ट्राला मोदी सरकारच्या काळात एकाच वर्षात मिळाला. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्रात सहा लाख कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, डॉ. भागवत कराड, डॉ. संजय कुटे उपस्थित होते.

राहुल गांधी यांच्याशी जाहीर चर्चेची तयारीकाँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने साठ पानी उत्तर आधीच दिले आहे, त्यावर त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. काँग्रेसच्या एकाही निवडणूक प्रतिनिधीने मतदार याद्या वा अन्य विषयावर कोणताही आक्षेप मतदान आणि मतमोजणीवेळी घेतला नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक या विषयावर राहुल गांधींची इच्छा असेल तर खुली चर्चा करण्याची माझी तयारी आहे, असे फडणवीस यांनी एका प्रश्नात सांगितले. 

५५ कोटी जनधन खाती देशातील ८१ कोटी जनतेला मोफत धान्य दिल्याने ते दारिद्र्य रेषेच्या वर येण्यास मदत झाली. १५ कोटी घरांना नळजोडणी दिली गेली. आधीच्या सरकारने केवळ तीन कोटी नळजोडण्या दिल्या होत्या. ५५ कोटी जनधन खाती उघडली, मुद्रा योजनेत ५२ कोटी लोकांना अर्थसाहाय्य दिले, कृषी क्षेत्रासाठीची तरतूद २७ हजार कोटींवरून १ लाख ३७ हजार कोटींवर गेली. साडेबारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरमुक्त करण्यात आले, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार