शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार लोकशाहीसाठी धोकादायक, अण्णा हजारे यांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींजवळ व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 18:02 IST

लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अमंलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या साडेचार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे. सर्वोच्च न्यायालय, लोकसभा, राज्यसभा अशा सैंवाधानिक संस्थाच्या निर्णयाचेही मोदी सरकार पालन करीत नाहीत.

 राळेणसिद्धी (अहमदनगर) -  लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या साडेचार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे. सर्वोच्च न्यायालय, लोकसभा, राज्यसभा अशा संवाधानिक संस्थाच्या निर्णयाचेही मोदी सरकार पालन करीत नाहीत. त्यामुळे या सरकारची वाटचाल लोकशाहीकडे नसून हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. हा लोकशाहीसाठी खूप मोठा धोका आहे, अशा तीव्र शब्दांत मोदी सरकारबद्दल खंत व्यक्त करणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिले आहे.पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, लोकपाल आणि लोकायुक्त हा कायदा लोकसभा व राज्यसभा या संवैधानिक संस्थानी बनविलेला आहे. लोकपाल नियुक्त करून संसदेने तयार केलेल्या कायद्याचे पालन करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. परंतु नरेंद्र मोदी सरकार लोकपाल व लोकायुक्त कायद्याचे पालन करत नाही. संसदेने पारित केलेल्या या कायद्याची अंमलबजावणी केली नाही, त्यामुळे मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयानेही बऱ्याच वेळा फटकारले आहे. त्यामुळे हे सरकार सर्वोच्च न्यायालयाचा देखील मान ठेवत नाही अशा शब्दांत अण्णांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रपती हे पद देखील एक संवैधानिक संस्थाच आहे. त्यांनीच या कायद्यावर सही करून या कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकारला सांगितले. नरेंद्र मोदी सरकार हे सुद्धा करताना दिसत नाही.1966 साली देशांमध्ये स्वच्छ शासन- स्वच्छ प्रशासन  निर्माण होण्यासाठी प्रशासकीय सुधारणा आयोगाची स्थापना केली आणि आयोगाने स्वच्छ शासन - स्वच्छ प्रशासन निर्माण होण्यासाठी केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्त असावे अशी शिफारस केली होती. प्रशासकीय सुधारणा ही पण एक संवैधानिक संस्था आहे. लोकसभा-राज्यसभा सर्वोच्च न्यायालय आणि प्रशासकीय सुधारणा आयोग यासर्व संवैधानिक संस्थाचे नरेंद्र मोदी सरकारकडून पालन होताना दिसत नाही. हा आमच्या देशातील लोकशाहीला एक मोठा धोका आहे. संवैधानिक संस्थाचे पालन न करणे हे लोकशाहीकडून हुकूमशाही कडे होणारी वाटचाल आहे अशी मला संभावना वाटते. यासाठी मी 30 जानेवारी 2019 पासून माझ्या आमरण उपोषणाला सुरुवात करत आहे. माझा कोणत्याही पक्ष किंवा पार्टीशी संबंध नाही. पण गाव, समाज आणि देशसेवा करण्यासाठीच मी माझं जीवन ठरविले आहे. लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी न करण्याने माझी कोणतीच व्यक्तीगत हानी होणार नाही  परंतु देशातील संवैधानिक संस्थांचे सरकारकडून पालन व अंमलबजावणी न करणे ही मात्र देशासाठी एक  चिंतेची बाब आहे.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्र