शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मतांसाठी जात काढणारे मोदी पहिले पंतप्रधान : आनंद शर्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 15:47 IST

जे शहीदांच्या नावाने मते मागु शकतात ते मतांसाठी काही करू शकतात.....

पुणे : देशाने अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. पण मतांसाठी स्वत:ची जात काढणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. काँग्रेसने कधीही त्यांच्या जातीवर भाष्य केलेले नाही. पण जे शहीदांच्या नावाने मते मागु शकतात ते मतांसाठी काही करू शकतात, अशी टीका कांग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार आनंद शर्मा यांनी गुरूवारी येथे केली.काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, शहराध्यक्ष रमेश बागवे, जेष्ठ नेते उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते. ‘मी मागास जातीचा असल्याने विरोधक मला विरोध करत आहेत’ असे वक्तव्य मोदी यानी अकलूज येथील सभेत केले होते. याविषयी विचारले असता शर्मा यांनी ही टीका केली. ते म्हणाले, मोदी आता हताश झाले आहेत. म्हणून जातीचा आधार घेत आहेत. यापुर्वी देशात डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, लाल बहाद्दुर शास्त्री असे अनेक पंतप्रधान होऊन गेले. पण त्यांनी राजकारण करताना कधीही जात आणली नाही. पण असे करणारे मोदी पहिले पंतप्रधान आहेत. आधी त्यांनी मते मागण्यासाठी लष्कराचा आधार घेतला. आता जातीचा आधार घेत आहेत. ते पंतप्रधानांसारखा कधीच विचार कर नाहीत, बोलत नाहीत. राष्ट्रवादाच्या मुद्यावरही त्यांनी मोदी व भाजपावर टीका केली. ‘मोदींनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. स्वातंत्रपुत्र काळात इंग्रजांविरोधात काँग्रेस लढत असताना यांनी त्यांना मदत केली. पंतप्रधान अज्ञानी आहेत. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्या सर्वांना ते देशद्रोही ठरवतात. खऱ्या मुद्यांपासून ते पळत आहेत. २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडावा. पण ते गप्प आहेत. मतदारांचा विवेक आणि संयमाला ते चुकीचे समजत आहेत. यापुर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी मतदारांच्या भावनांचा अपमान केला नाही. देशात पहिल्यांदाच असले झाले आहे,’ अशी टीका शर्मा यांनी केली.-------------------

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी