शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

माेदी आणि शहा हेच तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख : याेगेंद्र यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 20:10 IST

माेदी आणि शहा हेच तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख असल्याची घाणाघाती टीका याेगेंद्र यादव यांनी केली.

पुणे : हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करुन हिंसाचार घडवणे हा सर्वात माेठा देशद्राेह आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि गृहमंत्री अमित शहा हे खरे तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख आहेत अशा शब्दात स्वराज इंडिया पक्षाचे प्रमुख याेगेंद्र यादव यांनी माेदी आणि शहा यांच्यावर टीका केली. 

पुण्यातील काेंढवा भागात सुरु असलेल्या प्रती शाहीनबाग आंदाेलनाला पाठींबा देण्यासाठी यादव आज पुण्यात आले हाेते. यावेळी आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विराेधात भारत जाेडाे आंदाेलन करण्यात येणार असून 22 फ्रेब्रुवारी ते 23 मार्च या दरम्यान या कायद्यांविषयी नागरिकांमध्ये जागृती करणार असल्याचेही यादव यांनी यावेळी स्पष्ट केले. 

यादव म्हणाले, सीएए, एनआरसी यांना विराेध करण्यासाठी 'हम भारत के लाेग' ही चळवळ उभी करण्यात आली. या चळवळीत आता 125 हून अधिक संघटना सहभागी झाल्या आहेत. हे केवळ मुस्लिम समाजाचे नाही तर सर्वच समाजाचे आंदाेलन झाले आहे. तरुण माेठ्या संख्येने या कायद्यांच्या विराेधात रस्त्यावर उतरले आहेत. याचे आता 'भारत जाेडाे' या आंदाेलनात आम्ही रुपांतर करत आहाेत. ते ताेडायचे काम करतील आम्ही जाेडायचे काम करु. भारत जोडो हे आंदोलन हे एका नवीन भारताच्या निर्मिती चे आंदोलन असणार आहे. एन पी आरच्या माध्यमातून एनआरसी आणले जात आहे. एनपीआर आणि जनगणनेचा कुठलाही संबंध नाही. जनगनणेचा वेगळा कायदा आहे. एनपीआर हे सिटीझनशिप अमेंटमेंट कायद्याच्या अंतर्गत येते. प्रधानमंत्री सीएएवर स्पष्टतेने बाेलतात परुंतु एनपीआर आणि एनआरसीवर बाेलण्यास तयार नाहीत. 

श्रीलंकेचे अनेक तमिळ हिंदू नागरिकत्व मागतायेत त्यांना सरकार का नागरिकत्व देत नाही ? असा प्रश्न देखील यादव यांनी उपस्थित केला. तसेच स्वामी विवेकानंद यांनी शिकागाेमध्ये म्हंटले हाेते की या देशात शरणागती मागणाऱ्या प्रत्येकाला या देशाने नागरिकत्व द्यायला हवे. भाजपा विवेकानंद यांच्या विचारांना माननार आहे की नाही असेही ते यावेळी म्हणाले. शाहीनबागच्या आंदाेलनाबाबत बाेलताना ते म्हणाले, नागरिकांना कमीत कमी त्रास हाेईल अशा पद्धतीने आंदाेलन करायला हवे. यावर मार्ग काढता येऊ शकताे. सीएए रद्द करता येणार नाही असा सर्वाेच्च न्यायालयाने म्हंटले आहे या प्रश्नावर बाेलताना ते म्हणाले हा सर्वाेच्च न्यायालयाची परीक्षा पाहणारा कायदा आहे. 

राज्य सरकारच्या चारित्र्य पडताळण्याची ही वेळमहाराष्ट्र सराकरचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यासाेबत मंचावर येत सीएए, एनआरसीला विराेध केला. परंतु राज्य सरकारने सीएएच्या बाजूने परिपत्रक काढले. त्यामुळे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच तसे परिपत्रक काढावे अशी मागणी यादव यांनी केली. तसेच ही राज्य सरकारच्या चारित्र्य पडताळणीची वेळ असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवPuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा