पारंपरिक चवींना आधुनिक साज

By Admin | Updated: August 22, 2016 02:09 IST2016-08-22T02:09:38+5:302016-08-22T02:09:38+5:30

शहर-उपनगरातील विविध महिला मंडळांच्या भेटीत श्रावणमहोत्सव अधिकाधिक रंगतो आहे.

Modern tastes modern decorations | पारंपरिक चवींना आधुनिक साज

पारंपरिक चवींना आधुनिक साज


मुंबई : शहर-उपनगरातील विविध महिला मंडळांच्या भेटीत श्रावणमहोत्सव अधिकाधिक रंगतो आहे. दादर येथील वनिता समाज आणि अंधेरी आझादनगर येथील त्रिवेणी महिला मंडळांच्या प्राथमिक फेरीलाही स्पर्धकांनी उत्तम प्रतिसाद देत उत्साह वाढविला. इटालियन स्पाँजी वडा, अननस केकवडा, फणसाच्या पानातल्या इडल्या, उलूविची खीर, आंब्याच्या रसातील पानगी, पंचामृत वडा अशा एक ना अनेक पदार्थांच्या पारंपरिक चवीला आधुनिक साज देत, सहभागी स्पर्धकांनी परीक्षकांचे मन जिंकले.
अंधेरी आझादनगर येथील त्रिवेणी महिला मंडळातील कविता नाईक, अनुया नार्वेकर, दक्षा, कनाविया, सुधा हिंदळेकर, अनुजा मंत्री या स्पर्धकांनी अंतिम फेरीत स्थान मिळविले, तर दादर वनिता समाजच्या विद्या वागळे, मृणालिनी साठ्ये, नंदिनी बिवलकर , रेखा वाडेकर आणि पूर्वा देशमुख यांनी उत्कृष्ट सादरीकरण आणि पदार्थांच्या नावीन्यपूर्ण पाककृतींच्या माध्यमातून अंतिम फेरीत स्थान पटकाविले. अंतिम फेरीत स्थान मिळविलेल्या सर्व स्पर्धकांना वंडरशेफतर्फे विशेष भेट देण्यात आली. मिती क्रिएशन्सच्या उत्तरा मोने यांची संकल्पना असलेल्या स्पर्धेच्या या प्राथमिक फेऱ्यांचे परीक्षण तन्वी हर्बल डॉ. मेधा मेहंदळे, फोंडाघाट फार्मसीच्या योगिता प्रभू, पन्ना परुळेकर, पितांबरीच्या शिवानी नेमावरकर, एस्सेलवर्ल्डचे नीलय वैद्य आणि वंडरशेफचे मायका जगताप यांनी केले.
दादर वनिता समाजच्या प्राथमिक फेरीदरम्यान एस्सेलवर्ल्ड लकी ड्रॉमध्ये विद्या वागळे यांनी स्थान मिळविले. वंडरशेफ लकी ड्रॉमध्ये उल्का बोडस यांना भेटवस्तू मिळाली. पितांबरीच्या लकी ड्रॉमध्ये नीता रावते, मृणालिनी गडकरी, मृणालिनी साठ्ये या विजेत्या ठरल्या, त्यांना बक्षिसे मिळाली. तन्वी हर्बलच्या लकी ड्रॉमध्ये वनिता चौबळ, वेदश्री प्रधान, प्रचिती बेर्डे विजेत्या ठरल्या. अंधेरी आझादनगर येथील त्रिवेणी महिला मंडळांच्या प्राथमिक फेरीत एस्सेलवर्ल्ड लकी ड्रॉमध्ये रमा कुसनार, वंडरशेफ लकी ड्रॉमध्ये अनुपमा जाधव, पितांबरी लकी ड्रॉमध्ये निशा आंबेकर, शीला नाईक, चित्रा नलावडे आणि तन्वी हर्बल लकी ड्रॉमध्ये सुनीता राजे, अनुराधा कानेटकर, भक्ती भोगांवकर या विजेत्या ठरल्या. विविध लकी ड्रॉमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
>श्रावणमहोत्सवाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे ही स्पर्धा खूप आवडली. त्यामुळे मंडळांतील अनेक जणींनी उत्साहाने यात सहभाग घेतला. कारण रोजच्या पदार्थांना वेगळ्या प्रकारे सादर करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरले. बक्षिसाची अपेक्षा न करता, अनेक महिलांनी या स्पर्धेच्या संधीचा फायदा घेतला.
- नलिनी पाटील, अध्यक्ष, त्रिवेणी महिला मंडळ

Web Title: Modern tastes modern decorations