मुंबईत मॉडेलचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: May 17, 2015 18:40 IST2015-05-17T18:20:14+5:302015-05-17T18:40:09+5:30
मुंबईतील वर्सोवा येथे राहणा-या मॉडेलचा तिच्या राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला आहे.

मुंबईत मॉडेलचा संशयास्पद मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - मुंबईतील वर्सोवा येथे राहणा-या मॉडेलचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शिखा जोशी (वय ३० वर्ष) असे या मॉडेलचे नाव असून तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार झाल्याचे आढळले आहे. ही आत्महत्या आहे की हत्या हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
वर्सोवा येथील इमारतीमध्ये राहणा-या शिखा जोशीचा मृतदेह घराच्या बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला आहे. शिखाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजते. ही आत्महत्या आहे की हत्या याचा पोलिस तपास करत आहे. शिखाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या घटनेने वर्सोव्यात खळबळ माजली असून मुंबईत एकट्या राहणा-या महिल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.