दहा जिल्ह्यांतील मॉडेल स्कूल होणार बंद!
By Admin | Updated: June 3, 2015 01:51 IST2015-06-03T01:51:56+5:302015-06-03T01:51:56+5:30
केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीवर गेल्या चार वर्षांपासून चालविल्या जाणाऱ्या मॉडेल स्कूल आता बंद होणार आहे़ यंदाचे इयत्ता सहावीसाठीचे प्रवेश थांबविण्यात आले

दहा जिल्ह्यांतील मॉडेल स्कूल होणार बंद!
अभिनय खोपडे, गडचिरोली
केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीवर गेल्या चार वर्षांपासून चालविल्या जाणाऱ्या मॉडेल स्कूल आता बंद होणार आहे़ यंदाचे इयत्ता सहावीसाठीचे प्रवेश थांबविण्यात आले असून, यासंदर्भातील आदेश संबंधित शाळांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी देण्यात आले आहेत़ यामध्ये महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमधील सुमारे ५० शाळांचा समावेश आहे़
राज्यात पालघर, नाशिक, नंदूरबार, जालना, हिंगोली, कोल्हापूर, गडचिरोली, परभणी, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये मॉडेल स्कूल ही केंद्र पुरस्कृत योजना सन २०११-१२ पासून सुरू होती. केंद्र शासनाने मॉडेल स्कूल योजना २०१५-१६ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ एप्रिलला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठकीत निर्णय दिला. त्यामुळे २०१५-१६ या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता सहावीत प्रवेश दिले जाणार नाही. शासनाच्या निर्णयामुळे गडचिरोली जल्ह्यातील पाच, तर राज्यातील ५० शाळा बंद होणार आहे़