वाहतूक नियंत्रणासाठी मोबाइल व्हॅन
By Admin | Updated: July 20, 2016 02:05 IST2016-07-20T02:05:08+5:302016-07-20T02:05:08+5:30
तळेगाव-चाकण मार्गावरील वाहतूक सुरक्षितता लक्षात घेऊन आमदार फंडातून येत्या दोन महिन्यांत सीसीटीव्हीयुक्त ट्रॅफिक कंट्रोल व व्हिजिलन्स केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी मोबाइल व्हॅन
तळेगाव दाभाडे : तळेगाव-चाकण मार्गावरील वाहतूक सुरक्षितता लक्षात घेऊन आमदार फंडातून येत्या दोन महिन्यांत सीसीटीव्हीयुक्त ट्रॅफिक कंट्रोल व व्हिजिलन्स केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आॅक्टोबरमध्ये उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात येणार असून, बाह्यवळण मार्गासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले.
नगरसेवक सुनील शेळके यांनी स्वखचार्तून तळेगाव-चाकण मार्गावर बसविलेल्या दुभाजकाचे लोकार्पण, तसेच वाहतूक पोलिसांसाठी वाहतूक नियंत्रक मोबाइल व्हॅन सुपूर्त करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पाचे उद््घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उद्योजक शंकर शेळके, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणे, केशव वाडेकर, सुरेश शहा, संतोष दाभाडे, प्रशांत ढोरे, माजी नगरसेवक चंद्रकांत काकडे, पोलीस निरीक्षक वसंत बाबर आदी उपस्थित होते. प्रकल्पासाठी आर्थिक योगदान दिल्याबद्दल शंकर शेळके व उद्योजक सुधाकर शेळके, अमीन खान, दिलीप डोळस, गणेश बोराडे यांनी मोफत सेवा दिल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला. सुनील शेळके म्हणाले, ‘व्हॅन प्रदान उपक्रम हा केवळ सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून राबविण्यात आला आहे.’’
नगरसेवक गणेश भेगडे, रवींद्र दाभाडे व राजेंद्र जांभूळकर, नीलेश लोणकर, नगरसेविका नीलिमा दाभाडे, सुरेखा आवारे, अमृता टकले-पंडित, सुजाता खेर, शोभा भेगडे, रजनी ठाकूर उपस्थित होते.(वार्ताहर)