मोबाइल चोरटा जेरबंद

By Admin | Updated: March 21, 2017 03:40 IST2017-03-21T03:40:09+5:302017-03-21T03:40:09+5:30

शहरातील वेगवेगळ्या भागांत मोबाइलवर बोलत जाणाऱ्यांच्या हातातून मोबाइल हिसकावून पळणाऱ्या दुकलीपैकी सरफराज ऊर्फ सिम्मू इम्तियाज कुरेशी

Mobile thieves marsh | मोबाइल चोरटा जेरबंद

मोबाइल चोरटा जेरबंद

ठाणे : शहरातील वेगवेगळ्या भागांत मोबाइलवर बोलत जाणाऱ्यांच्या हातातून मोबाइल हिसकावून पळणाऱ्या दुकलीपैकी सरफराज ऊर्फ सिम्मू इम्तियाज कुरेशी (२०, रा. बंजारा वस्ती, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख १६ हजार ५०० रुपयांचे नऊ मोबाइल हस्तगत केले.
सरफराज हा वागळे इस्टेटमधील बंजारा वस्तीमध्ये असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलसांच्या विशेष पथकाने १७ मार्च रोजी रात्री ९.४० वा. च्या सुमारास त्याला अटक केली. सुरुवातीला आपण त्या गावचेच नसल्याचा आव आणणाऱ्या सरफराजने नंतर एकेक करून नऊ मोबाइल युसूफ या साथीदाराच्या मदतीने चोरल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याला सुरुवातीला ठाणे न्यायालयाने २० मार्च आणि त्यानंतर आणखी २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
अटक आरोपीकडून १० हजारांचे दोन, १६ हजारांचे दोन आणि २५ हजारांचा एक असे नऊ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच आणखी काही मोबाइल मिळण्याची शक्यता असून त्याच्या दुसऱ्या साथीदाराचाही शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Mobile thieves marsh