महापालिकेत चर्चेपेक्षा नगरसेविकेला मोबाईल गेम जास्त प्यारा
By Admin | Updated: March 29, 2017 16:56 IST2017-03-29T16:49:37+5:302017-03-29T16:56:43+5:30
सभागृहामध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा सुरु असताना काही लोकप्रितिनिधी दाखवण्यापुरता शरीराने तिथे उपस्थितीत असतात पण..

महापालिकेत चर्चेपेक्षा नगरसेविकेला मोबाईल गेम जास्त प्यारा
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 29 - सभागृहामध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा सुरु असताना काही लोकप्रितिनिधी दाखवण्यापुरता शरीराने तिथे उपस्थितीत असतात पण मन मात्र त्यांचे दुसरीकडेच लागलेले असते. सभागृहात कामकाज सुरु असताना डुलकी काढणे किंवा मोबाईलमध्ये हरवून जाणे हे लोकप्रतिनिधींचे बेजबाबदार वर्तन आपण अनेकदा पाहिले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सभागृहातला असाच एक प्रकार समोर आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत अर्थसंकल्पावर जोरदार चर्चा सुरु असताना सोनी अहिरे ही नगरसेविका चक्क मोबाईल गेम खेळण्यामध्ये हरवून गेली होती. आपले हे वर्तन कॅमे-यात कैद होतेय याचे भानही या नगरसेविकेला नव्हते.
सभागृहात परिवहन सेवेबद्दल दोन तासापासून वादळी चर्चा सुरु असताना बसपाच्या नगरसेविका सोनी अहिरे चक्क मोबाईलवर गेम खेळत होत्या. अशा बेजबाबदार वर्तन करणा-या सोनी अहिरे एकमेव लोकप्रतिनिधी नाहीत. यापूर्वी ओदिशा, कर्नाटक विधानसभेमध्ये चर्चेच्या वेळी काही आमदारांना मोबाईलवर पॉर्न क्लिप पाहताना पकडण्यात आले होते.