जमावाने घेतला मांत्रिकाचा बळी

By Admin | Updated: July 14, 2014 03:03 IST2014-07-14T03:03:35+5:302014-07-14T03:03:35+5:30

तालुक्यातील अमितनगरमध्ये शनिवारी रात्री हनुमान मंदिराच्या पटांगणात गावकऱ्यांनी जादूटोण्याच्या संशयावरून गावातील मांत्रिक शंकर हरी पिंपळकर (५५) याला मरेस्तोवर मारहाण केली

The mob took the mantra victim | जमावाने घेतला मांत्रिकाचा बळी

जमावाने घेतला मांत्रिकाचा बळी

अनेकश्वर मेश्राम, बल्लारपूर (चंद्रपूर) -
तालुक्यातील अमितनगरमध्ये शनिवारी रात्री हनुमान मंदिराच्या पटांगणात गावकऱ्यांनी जादूटोण्याच्या संशयावरून गावातील मांत्रिक शंकर हरी पिंपळकर (५५) याला मरेस्तोवर मारहाण केली. उपसरपंचासह पाच जणांना या प्रकरणी अटक झाली आहे.
बल्लारपूर शहरापासून ३ किमी अंतरावरील अमितनगर वस्तीत शंकर पिंपळकर हा गुराखी म्हणून परिचित आहे. मात्र तो जादूटोणा करतो व या कामी गावातीलच एक महिला त्याला सहकार्य करते. त्यांनी केलेल्या जादूटोण्यामुळे गावातील माणसे मृत्युमुखी व आजारी पडतात, असा गावकऱ्यांचा समज होता. शनिवारी आषाढी पौर्णिमा होती. आषाढी पौर्णिमेला सिद्धी प्राप्त करण्यासाठी शंकर पिंपळकरसह गावातील एक महिला व अन्य पाच-सहा जण गावालगतच्या स्मशानभूमीत नग्नावस्थेत पूजापाठ करीत असल्याचे दोघांनी पाहिल्याचे पसरताच गावकऱ्यांनी रात्री ११ वाजता मांत्रिक पिंपळकरला हनुमान मंदिरात आणले. तेथे प्रक्षुब्ध जमावाने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात रक्तबंबाळ झालेल्या शंकरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
३०० लोकवस्तीच्या अमितनगर या संपूर्ण गावालाच अंधश्रद्धेने पछाडले आहे. काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून बाहेरगावातील एका मांत्रिकाला गावात आणले. गावावर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी गावाच्या चारही सीमा बांधून घेण्यात आल्या होत्या, अशी माहिती गावकऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: The mob took the mantra victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.