शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis : शिंदे गटाबाबत मनसेचे ‘वेट ॲण्ड वॉच’; एकमेव आमदार म्हणतात, ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जवळीक शक्य’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 10:57 IST

पक्षांतर कायद्यातील तरतुदींमुळे दोन तृतीयांश बहुमत असले तरी एकनाथ शिंंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी सुरुवातीला भाजपात हा गट विलीन केला जाणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला होता.

मुंबई/अलिबाग : शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मात्र सध्या कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर करण्यास नकार दिला आहे. पक्षाने ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली असल्याचे सांगताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे आमच्यासोबत येत असतील तर जवळीक होऊ शकते. राज ठाकरे यांच्या तब्येतीबाबत शिंदे यांनी संपर्क केला असल्याची माहिती माध्यमांमधून कळली असल्याचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी अलिबाग येथे सांगितले.   पक्षांतर कायद्यातील तरतुदींमुळे दोन तृतीयांश बहुमत असले तरी एकनाथ शिंंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी सुरुवातीला भाजपात हा गट विलीन केला जाणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला होता. त्यानंतर बच्चू कडू यांच्या प्रहारचाही पर्याय चर्चेत आला होता. मात्र, हिंदुत्वाचा वारसा आणि ठाकरे ब्रॅण्ड यामुळे मनसेचा पर्याय तुलनेत अधिक उपयुक्त असल्याने विलीनीकरणाची वेळ आलीच तर मनसेचा पर्याय उत्तम असल्याचा तर्क मांडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त सोमवारी समोर आले. त्यामुळे आता मनसे काय भूमिका घेणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.या चर्चेवर मनसेने मात्र अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. मनसे सध्या ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात कुणीही प्रसारमाध्यमांशी बोलू नये, अशी स्पष्ट ताकीद पक्षाकडून देण्यात आल्याचे समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून घरी परतले आहेत. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी नेतेमंडळी आणि पदाधिकारी त्यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ येथे त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना शिवतीर्थावरील वर्दळ वाढल्याने याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

एकनाथ शिंदे यांचे राज ठाकरे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध - राजू पाटीलहिंदुत्व हा मुद्दा एकनाथ शिंदे गटाने प्रामुख्याने घेतला असून, राज ठाकरे यांनीही हा मुद्दा आधीपासून घेतलेला असून, तो आम्ही पुढे नेत आहोत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे आमच्यासोबत येत असतील तर जवळीक होऊ शकते. मात्र, हा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेऊ शकतात, असे वक्तव्य मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले. अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील प्रश्नांबाबत राजू पाटील, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. शिवसेनेतील बंडखोरी आणि शिंदे यांचा मनसेसोबत येण्याबाबतचा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले,  एकनाथ शिंदे यांचे राज ठाकरे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

टॅग्स :Maharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMNSमनसेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरRaju Patilराजू पाटील