सरकारने काढला आरक्षणाचा जीआर , राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. शिवाजी पार्कचा वापर केवळ खेळासाठी व्हावा असे बजावत वर्षातील फक्त ४५ दिवस इतर कार्यक्रम घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. तशा आरक्षणाचा जीआर सरकारने बुधवारी जारी केला. न्यायालयाने शिवाजी पार्कला शांतता क्षेत्र वखेळाचे मैदान म्हणून घोषित केल्यानंतर येथील राजकीय तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंधने आली होती. > शिवाजी पार्कवरील आरक्षण १४ व १५ जानेवारी : बालदिन, बालमोहन विद्यामंदिर (२ दिवस)२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन (१० दिवस)१ मे : महाराष्ट्र दिन (५ दिवस)१५ आॅगस्ट : स्वातंत्र्य दिन (५ दिवस)६ डिसेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (७ दिवस)गणेश विसर्जनासाठी पाचवा, सातवा च दहावा असे ३ दिवस दसरा मेळावा, जगन्नाथ रथयात्रा, मराठी भाषा दिन, गुढीपाडवा इत्यादी कार्यक्रमांसाठी ७ दिवस प्रसंगानुरुप शासनातर्फे होणाऱ्या कार्यक्रमांसाठी ६ दिवस
शिवाजी पार्कवर मनसेचीही ‘गुढी’
By admin | Updated: January 21, 2016 04:04 IST