मनसेची ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर

By Admin | Updated: September 26, 2014 13:15 IST2014-09-26T03:23:12+5:302014-09-26T13:15:31+5:30

एकीकडे आघाडी आणि महायुतीच्या घटस्फोटाची घोषणा करत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर केली

MNS's 'Blue Print' submission | मनसेची ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर

मनसेची ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर

मुंबई : एकीकडे आघाडी आणि महायुतीच्या घटस्फोटाची घोषणा करत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर केली. सगळेच पक्ष केवळ आपापला विचार करत असताना आपण तरी महाराष्ट्राचा विचार करुयात, असे म्हणत राज यांनी तब्बल दोन तास राज्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडला.
षण्मुखानंद सभागृहात आयोजित सभारंभात शिक्षण, शेती, शहरे, उद्योग, रोजगार, शासनव्यवस्था, संस्कृती, समाज आणि टोलबाबात आपले धोरण सादर केले. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही मुलभूत गरजांच्या पलीकडे आपण विचार करू शकलो नाही. प्रगतीला ख-या अर्थाने गती मिळाली नाही. ही ब्ल्यू प्रिंट परिपूर्ण नाही. अनेकांनी यापूर्वी असा प्रयत्न केल्याचे सांगून राज्याच्या चिरंतन विकासासाचा हा प्रयत्न असल्याचे राज म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: MNS's 'Blue Print' submission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.