शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

“संजय राऊत चिरकूट माणूस, कोणी धमकी द्यावी एवढही त्यांचं कर्तृत्व नाही”; मनसेची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 13:58 IST

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकीवरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची यासंदर्भात भेट घेतली होती. मात्र, यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

राज ठाकरे यांनी लागोपाठ घेतलेल्या सभांनंतर शिवसेना आणि मनसेत हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप तीव्र व्हायला लागल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर पलटवार करत, त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

कोणी धमकी द्यावी एवढही त्यांचं कर्तृत्व नाही

योगेश चिले यांनी एक ट्विट केले असून, यातून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत चिरकूट माणूस... त्यांना मुंगीही धमकी देणार नाही... कोणी धमकी द्यावी एवढही त्यांच कर्तृत्व नाही..., अशी बोचरी टीका योगेश चिले यांनी केली आहे. धमकीची अशी शेकडो पत्र शिवसेना भवनात रोज येत असतात. महाराष्ट्रात कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे स्टंटबाजी सोडा आणि लोकांच्या प्रश्नांवर बोला, असा खोचक टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.

दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या कार्यालयात एक धमकीचे पत्र आले असून यात बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन संबंधित पत्र त्यांच्या सुपूर्द केले होते. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना संबंधित विषयाची सविस्तर माहिती दिली. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्नावरुन तुम्ही सुरू केलेले आंदोलन थांबवा नाहीतर तुम्हाला जीवानिशी मारले जाईल आणि तुमच्या राज ठाकरेंनाही सोडणार नाही, अशी धमकी पत्रातून देण्यात आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली होती.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMNSमनसेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण