मनसे कार्यकर्त्यांनी जाळला विदर्भाचा झेंडा

By Admin | Updated: May 3, 2016 20:53 IST2016-05-03T20:52:33+5:302016-05-03T20:53:38+5:30

महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सायंकाळी वेगळ्या विदर्भाचा झेंडा जाळला. विदर्भवाद्यांनी राज्याच्या अस्मितेचा अपमान केला

MNS workers torched Vidarbha flag | मनसे कार्यकर्त्यांनी जाळला विदर्भाचा झेंडा

मनसे कार्यकर्त्यांनी जाळला विदर्भाचा झेंडा

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३ : महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सायंकाळी वेगळ्या विदर्भाचा झेंडा जाळला. विदर्भवाद्यांनी राज्याच्या अस्मितेचा अपमान केला, त्यामुळे हे पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली. १ मे रोजी राज्याचे माजी महाधिवक्ता व जेष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी विदर्भाचा झेंडा फडकवला होता.
 
नागपूरातील धरपमेठ परिसरात सायंकाळ मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी व शहर उपप्रमुख प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते एकत्र आले. विदर्भवाद्यांच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा जाळला. महाराष्ट्राचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही व त्याचे तुकडेदेखील होऊ देणार नाही, या आशयाची निदर्शने केली.
मनसैनिकांचे आंदोलन आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांनी जास्त कुमक मागवून आंदोलनकर्त्या मनसैनिकांना अटक केली. या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केले. यावेळी मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. 
 
यापुढे जर ढोंगी विदर्भवाद्यांनी अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर मनसेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम अतिशय गंभीर होतील असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला.
 
विदर्भाच्या नावावर लोकांच्या भावनेशी खेळून असंतोषाचे वातावरण पसरवणारे काही क्षुल्लक विदर्भवाद्यांचा राजकीय खेळ आम्ही संपुष्टात आणू असे प्रतिपादन मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केले.

Web Title: MNS workers torched Vidarbha flag