शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"सावरकर यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही," मनसेचा राहुल गांधींना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 14:06 IST

संदीप देशपांडे म्हणाले, "छत्रपती शिवाजी पार्क मैदानाने अनेक वाघांच्या डरकाळ्या ऐकल्या आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आचार्य आत्रे असतील, राज ठाकरे असतील."

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही यात्रा 17 मार्चला शिवाजी पार्कवर पोहोचणार आहे. येथे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची एकत्र सभा होणार आहे. यावरून, सावरकर यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींना यांना दिला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, "छत्रपती शिवाजी पार्क मैदानाने अनेक वाघांच्या डरकाळ्या ऐकल्या आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आचार्य आत्रे असतील, राज ठाकरे असतील. त्याच शिवतीर्थावर दुर्दैनाने 17 तारखेला काँग्रेसच्या कोल्ह्यांची कुही कुही ऐकण्याचं दुर्भाग्य महाराष्ट्राला लाभणार आहे. त्याच बरोबर बाघाचं कातडं पांघरलेले लांडगेही त्यांच्यासोबत असतील असं वाटतंय. माहीत नाही. पण लोकशाहीत प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. हे आम्ही मान्य करतो."

...तर राहुल गांधी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही -"राहुल गांधींना एक नक्की सांगतो, छत्रपती शिवाजी पार्क मैदान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. सावरकरांचं घर या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ आहे. तुम्ही महाराष्ट्रात येत आहात, तुमचं म्हणणं मांडा आमची ना नाही. मात्र येथे येऊन पुर्वीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात अपमानजनक वक्तव्य केलं, तर ही महाराष्ट्रातील चौदा कौटी जनता, राहुल गांधी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही," असे देशपांडे म्हणाले. 

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना