मनसे उपाध्यक्ष सुरेश गुजर यांचे निधन
By Admin | Updated: January 14, 2015 06:42 IST2015-01-14T06:42:21+5:302015-01-14T06:42:21+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष सुरेश गुजर यांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

मनसे उपाध्यक्ष सुरेश गुजर यांचे निधन
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष सुरेश गुजर यांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मनसेत उपाध्यक्ष पदावर कार्यरत असणारे गुजर भारतीय विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून विद्यार्थी चळवळीशी जोडले गेले होते. मृत्युसमयी ६३ वर्षीय गुजर यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
भाविसेच्या मुंबईतील विस्तारात गुजर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाविसेची सूत्रे राज ठाकरेंकडे आल्यानंतर गुजर यांची भाविसेच्या प्रमुख संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. (प्रतिनिधी)