शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Raju Patil : "रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवं उभं करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 10:47 IST

MNS Raju Patil And Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या घोषणेनंतर आता मनसेने खड्ड्यांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. "रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याचीही तरतूद करा" असं म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांत दोन मोठ्या अपघातांनी केंद्र सरकारचे विशेषकरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे (Nitin Gadkari) लक्ष वेधून घेतले आहे. विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांचा दणकट गाड्या असूनही अपघाती मृत्यू झाला होता. कारण ते मागच्या सीटवर बसले होते आणि सीटबेल्ट न बांधल्याने त्यांचे डोके आदळून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. नितीन गडकरींनी कार कंपन्यांना कारमध्ये सहा सीटबेल्ट लावणे अनिवार्य केले आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. असे असले तरी आता सीटबेल्टवरून देखील गडकरींनी मोठे संकेत दिले आहेत. आता त्याचीही तयारी ऑटो कंपन्यांना करावी लागणार आहे. 

नितीन गडकरींच्या घोषणेनंतर आता मनसेने खड्ड्यांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. "रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याचीही तरतूद करा" असं म्हटलं आहे. मनसेचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील (MNS Raju Patil) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "सुरक्षेच्या दृष्टीने जसं सीटबेल्ट बांधणं अनिवार्य केलं आहे तसंच रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याचीही तरतूद करा मंत्रीमहोदय!" असं म्हटलं आहे. तसेच यामध्ये नितीन ग़डकरींना देखील टॅग केलं आहे. आता_सहन_नाही_होत हा हॅशटॅग देखील वापरला आहे. 

"सीट बेल्ट लावला नाही तर दंडाची पावती फाडली जाईल"

सध्या देशात ड्रायव्हरने सीटबेल्ट लावावा असा नियम आहे. त्याचीच पावती फाडली जाते. सुरक्षा हवी असेल किंवा जे जागरुक आहेत, ते सहप्रवाशाला देखील पॅसेंजर सीटबेल्ट वापरण्यास सांगतात. परंतू, सध्यातरी पाठीमागच्या सीटवर बसलेला व्यक्ती सीट बेल्ट वापरत नाही. या सीटवरील प्रवाशांनी सीटबेल्ट वापरले तर अनेकांचे जीव वाचतील. कारण हे सीटबेल्ट या मागच्या सीटवर बेसावध बसलेल्या व्यक्तींना सीटवरच बांधून ठेवतील आणि ते पुढे आदळणार नाहीत. आता मागच्या सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाने सीट बेल्ट लावला नाही तर दंडाची पावती फाडली जाईल, असे गडकरी म्हणाले. गडकरी यांनी मंगळवारी एका खासगी कार्यक्रमात सरकारच्या निर्णयाची माहिती दिली.

"मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींना सीटबेल्ट लावणे सक्तीचे होणार"

सध्याच्या तंत्रज्ञानानुसार पुढील सीटवर बसलेल्या व्यक्तींना सीटबेल्ट लावला नसेल तर अलार्म वाजत राहतो. आता मागच्या सीटवर देखील तशीच सोय केली जाणार आहे. हा नियम लागू झाल्यावर ज्या गाड्या रस्त्यावर येतील त्यात मागच्या सीटखाली वजनाचा सेन्सर असणार आहे. त्या सीटवर कोणी बसले आणि सीटबेल्ट लावला नाही तर अलार्म वाजत राहिल. याबाबतचा आदेश येत्या तीन दिवसांत जारी होईल असेही गडकरी म्हणाले आहेत. हा आदेश गाडी छोटी असो की मोठी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू होणार आहे. या गाड्यांमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींना सीटबेल्ट लावणे सक्तीचे होणार आहे. मागच्या सीटवरही बेल्ट लावण्यासाठी क्लिपची व्यवस्था करावी लागेल. अलार्म सिस्टीमही बसवावी लागेल, जी मागे बसलेल्या प्रवाशाने सीट बेल्ट न लावल्यास वाजत राहील, असे गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेNitin Gadkariनितीन गडकरीPotholeखड्डे