शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"आजोबांनी दिलेला ठाकरी बाणा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय", राज ठाकरेंची प्रबोधनकार ठाकरेंना आंदराजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 12:28 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांना आंदराजली वाहिली.

मुंबई :  केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. प्रबोधनकार ठाकरे यांची मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते आणि इतिहासकार अशी ओळख होती. १७ सप्टेंबर १८८५ रोजी जन्मलेल्या प्रबोधनकारांनी आपल्या लेखणामुळे महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. महाराष्ट्राला लाभलेल्या या रत्नाचा मृत्यू २० नोव्हेंबर १९७३ मध्ये झाला. आज त्यांचा स्मृतीदिन असून यानिमित्ताने प्रबोधनकारांचे नातू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत आंदराजली वाहिली आहे.  

राज ठाकरेंची प्रबोधनकारांना आदरांजलीराज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणतात की, "आज आमच्या आजोबांची - प्रबोधनकारांची पुण्यतिथी. अन्याय दिसला तर लाथ मारायची, जे खरं असेल ते ठासून मांडायचं, आणि हे करताना नफा, नुकसान असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नाही, हा आजोबांनी दिलेला 'ठाकरी' बाणा, जो पुढच्या पिढीत आला आणि माझ्यातपण आला. मी कटाक्षाने आजोबांनी रूजवलेला हा ठाकरी बाणा कायम अंमलात आणायचा प्रयत्न करत आलोय आणि पुढे पण करत राहीन. आणि हेच बाळकडू पुढे पण देईन हे नक्की. आजोबांच्या स्मृतीस अभिवादन." 

...अन् वकील होण्याचे स्वप्न भंगलेप्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म पनवेल येथे झाला होता. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण तिथूनच पूर्ण केले. पुढे देवास येथे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. वडिलांची नोकरी गेली आणि पनवेलमध्ये पुढील शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे शिक्षण थांबले. त्यामुळे त्यांना कधी बारामतीत तर कधी मध्य प्रदेशातील देवासमध्ये धाव घ्यावी लागली. खरं तर दीड रुपये फी कमी पडल्याने ते मॅट्रिकची परीक्षा देऊ शकले नाहीत आणि त्यांचे वकील होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांनी साईन बोर्ड पेंटिंग, रबर स्टॅम्प बनवणे, बुक बाइंडिंग, वॉल पेंटिंग, फोटोग्राफी, मशीन मेकॅनिक इत्यादी उद्योग केले. त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. त्यांनी संपूर्ण जीवनभर लोकांचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी साहित्य निर्मिती केली. अखेर या प्रबोधनकारांची २० नोव्हेंबर १९७३ रोजी प्राणज्योत मालवली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे