मनसेचा पाडवा मेळावा रद्द
By Admin | Updated: March 21, 2017 03:42 IST2017-03-21T03:42:47+5:302017-03-21T03:42:47+5:30
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा यंदा होणार नाही.

मनसेचा पाडवा मेळावा रद्द
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा यंदा होणार नाही. व्यक्तिगत कारणासाठी परदेशात जात असल्याने गुढीपाडवा मेळावा होणार नसल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले.
शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा होता. त्याच धर्तीवर दोन वर्षांपासून मनसेने गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात केली होती. सोमवारी, ‘कृष्णकुंज’ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली. व्यक्तिगत कारणासाठी परदेशात जावे लागत असल्याने यंदा गुढीपाडवा मेळाव्यात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे यंदाचा मेळावा रद्द करण्यात आल्याचे राज यांनी बैठकीत सांगितले. मात्र, स्थानिक पातळीवर गुढीपाडवा आणि मराठी ननवर्षाचा उत्सव साजरा करण्याचे आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिले. (प्रतिनिधी)