अहमदनगर : राज्यातील एक लाख एसटीकामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे सर्वतोपरी पाठपुरावा सुरू असून, न्यायालयीन लढाईचाही मार्ग अवलंबला आहे़ कामगार व प्रवाशांच्या हितासाठी एसटीचे खासगीकरण होऊ देणार नाही, असे प्रतिपादन मनसे एसटी कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी येथे केले़महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन एसटी कामगार सेनेचा रविवारी येथे विभागीय मेळावा झाला. गेल्या २५ वर्षांपासून मान्यताप्राप्त संघटनेचे पदाधिकारी म्हणून मिरवणाऱ्यांनी एसटी कामगारांसाठी काहीच केले नाही़ कामगार हिताचा एकहीनिर्णय न घेता त्यांनी केवळस्वार्थ साधला. कामगारांना अपेक्षित वेतन नाही, गणवेशासाठी पुरेसेपैसे मिळत नाहीत़, भत्ताही नाही़ अनेक कामगार कर्जबाजारी झाले आहेत़ ते कुटुंबाचीही उपजीविका चालवू शकत नाहीत़ हा अन्याय दूर करण्यासाठी आता कामगारांनीच आवाज उठविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्यासाठी न्यायालयात लढाई सुरू आहे़ मनसेच्या पाठपुराव्यामुळे एसटीला टोलमुक्ती मिळाली. कामगारांना आवश्यक सुविधा मिळण्यासाठी लढा उभारणार असल्याचे अभ्यंकर यांनी सांगितले. मनसे कामगार सेना एसटी बँकेची निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मेळाव्याला नगरसह धुळे, नाशिक, औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांतील कामगार उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
एसटीच्या खासगीकरणाला मनसेचा विरोध
By admin | Updated: April 13, 2015 04:50 IST