मेट्रोतून मासे नेण्याच्या बंदीविरोधात मनसेचं आंदोलन
By Admin | Updated: August 29, 2016 18:35 IST2016-08-29T18:35:09+5:302016-08-29T18:35:09+5:30
मेट्रोतून कच्चे मांस नेण्यावर असलेल्या बंदीविरोधात मनसेने तीव्र आंदोलन केले आहे.

मेट्रोतून मासे नेण्याच्या बंदीविरोधात मनसेचं आंदोलन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मेट्रोतून कच्चे मांस नेण्यावर असलेल्या बंदीविरोधात मनसेने तीव्र आंदोलन केले आहे. सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वात वर्सोव्यात आंदोलन करण्यात आलं. मुंबई मेट्रोतून मासे घेऊन घरी परतणाऱ्या एका प्रवाशाला मेट्रो प्रशासनाने प्रवास करण्यास मज्जाव केला.
वर्सोवाहून अंधेरीला जाण्यासाठी संबंधित प्रवासी मेट्रोने निघाला असतानाच सुरक्षारक्षकांनी एक पोस्टर दाखवून मेट्रोमधून मासे किंवा इतर कोणताही मृत प्राणी नेण्यास बंदी असल्याचं लक्षात आणून दिलं. प्रशासनाच्या या आडमुठ्या भूमिकेचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेने हे आंदोलन छेडलं. दरम्यान, मेट्रोमध्ये मासे किंवा इतर कोणताही मृत प्राणी नेण्यास बंदी आहे.
हा कायदा देशभरातील प्रत्येक मेट्रोमध्ये लागू असून, मेट्रो अधिनियमात त्यासंदर्भात स्पष्ट उल्लेख असल्याचं मुंबई मेट्रोवनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. मेट्रोच्या बंद दरवाज्यात एसीमध्ये सहप्रवाशांना मासे किंवा मृत प्राण्यांच्या वासाचा त्रास होऊ नये, या हेतूने हा नियम केल्याचंही प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांना दंड लागू करण्याचाही प्रश्नच नाही, असेही प्रवक्ते म्हणाले आहेत.