मनसेने जाळला विदर्भाचा झेंडा

By Admin | Updated: September 14, 2016 19:46 IST2016-09-14T19:46:47+5:302016-09-14T19:46:47+5:30

विदर्भवाद्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा दुपारी व्हेरायटी चौकातच विदर्भवाद्यांच्याविरोधात निदर्शने करीत विदर्भवाद्यांचा झेंडा जाळला

MNS ignited Vidarbha's flag | मनसेने जाळला विदर्भाचा झेंडा

मनसेने जाळला विदर्भाचा झेंडा

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - विदर्भवाद्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा दुपारी व्हेरायटी चौकातच विदर्भवाद्यांच्याविरोधात निदर्शने करीत विदर्भवाद्यांचा झेंडा जाळला. तसंच विदर्भवादी मुर्दाबादचे नारेही दिले. 
 
मुंबईत विदर्भवाद्यांच्या पत्रकार परिषदेत मनसेने गोंधळ घातला. या घटनेचे पडसाद नागपुरातही उमटले. व्हेरायटी चौक येथे विदर्भवाद्यांनी सकाळी ११ वाजता मनसेच्या विरोधात आंदोलन केले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुपारी ३.३० वाजता त्याच ठिकाणी निदर्शने केले. विदर्भ संघटक हेमंत गडकरी आणि प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
 
हेमंत गडकरी यावेळी म्हणाले, विदर्भवाद्यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. यावेळी विदर्भवाद्यांनी सत्तेत असताना विदर्भाचा विकास केला नाही. आपल्या सात पिढ्यांची व्यवस्था करून ठेवली. आता त्यांना विदर्भ आठवत आहे. वामनराव चटप हे आमदार असताना त्यांनी विदर्भाचा विकास केला नाही. आता नातवंड खेळवण्याच्या वयात ते अखंड महाराष्ट्र तोडण्याची भाषा करीत आहेत. त्यांना मुंबईत मनसेने योग्य जागा दाखवली. प्रशांत पवार यांनी विदर्भवाद्यांनी आपापला राजीनामा द्यावा व पुन्हा निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले. 
 

Web Title: MNS ignited Vidarbha's flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.