शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Gajanan Kale : "मर्द, छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 10:37 IST

MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray : मनसेने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. दसरा मेळाव्यावरून निशाणा साधला आहे. 

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरू झाली असून पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. याच दरम्यान मनसेने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. दसरा मेळाव्यावरून निशाणा साधला आहे. 

"मर्द, छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू..." असं म्हणत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू..." असं म्हणत खाली एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. ज्यामध्ये हसऱ्या मेळाव्याची तयारी सुरू असं म्हटलं आहे. 

"टोमणे बॉम्ब, पाठीत खंजीर कोथळा बॉम्ब, मावळे कावळे बॉम्ब, मर्द छाताड बॉम्ब"

गजानन काळे यांनी केलेल्या ट्विटमध्ये "साहेब आजच्या भाषणात कोणते मुद्दे असतील? त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्याचीच तयारी सुरू आहे. डिस्टर्ब करू नका असं म्हटलं आहे. तसेच टोमणे बॉम्ब, पाठीत खंजीर कोथळा बॉम्ब, मावळे कावळे बॉम्ब, मर्द छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब" असं देखील म्हटलं आहे. शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाचा दसरा मेळावा मोठा व्हावा, त्याठिकाणी गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी ठाण्यातील माजी नगरसेवकांना सुचना देण्यात आल्या आहेत. 

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी सुरू 

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहेत. तसेच या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो ठळकपणे लावण्यात आले आहेत. शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. तसेच आम्ही विचारांचे वारसदार असे या पोस्टरवर लिहून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. तसेच बाळासाहेब तुमचा वाघ आहे म्हणून हिंदुत्वाला जाग आहे, असा एक बॅनर प्रसिद्ध करत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चिमटा काढला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण