शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार"; मनसेचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 16:32 IST

MNS Gajanan Kale Slams Shivsena : मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड मोडून काढण्यासाठी आता शिवसेना पक्षप्रमुखांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला केवळ १८ आमदार उपस्थित होते. या बैठकीत एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव स्वीकारू नका अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली. तर आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी शिवसेनेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे सूरतला रवाना झाले आहे. याच दरम्यान मनसेने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार" असं म्हणत मनसेने टीकास्त्र सोडलं आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "शिवसेनेच्या बैठकीत ५५ आमदारांपैकी फक्त १८ विधानसभा आमदार उपस्थित... तरी पुढील २५ वर्ष मोठे नवाबच मुख्यमंत्री असणार विश्वप्रवक्ते यांचा दावा... मनात राम न ठेवता फक्त नौटंकी म्हणून अयोध्येला जाऊन आलात की हे असं होतं... नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार..." असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी विशेष खबरदारी घेतली आहे. त्याचसोबत दुपारी ४ वाजता सर्व शिवसैनिकांना शिवसेना भवनाबाहेर जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा डाव उधळण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून जोरदार सुरू आहे. 

सध्या सुरत येथे भाजपा नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा सुरू आहे. काही वेळाने याठिकाणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसही पोहचणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिंदे यांच्याजागी अजय चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.  

टॅग्स :MNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण