FB वरुन मनसे नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपा कार्यकर्त्यांची हाणामारी
By Admin | Updated: March 26, 2017 21:39 IST2017-03-26T21:39:02+5:302017-03-26T21:39:02+5:30
फेसबुक पेजवर लाईक आणि कमेंट करण्यावरुन झालेल्या वादामधून नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपा नगरसेविकेच्या पतीसह कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली

FB वरुन मनसे नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपा कार्यकर्त्यांची हाणामारी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 26 : फेसबुक पेजवर लाईक आणि कमेंट करण्यावरुन झालेल्या वादामधून नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपा नगरसेविकेच्या पतीसह कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. ही घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुखसागर नगरमध्ये घडली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजुने फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
मनसे नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे (वय 43, रा. कृष्णलिला निवास, कात्रज) यांच्या फिर्यादीवरुन रवी एकनाथ संकपाळ (वय 44, रा. आनंदनगर सोसायटी, सुखसागरनगर), राजाभाऊ कदम, राहूल कामठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाभाऊ कदम यांच्या पत्नी भाजपाच्या नगरसेविका आहेत. तर रवी संकपाळ यांच्या फिर्यादीवरुन वसंत मोरे यांच्यासह बंडू सुर्यवंशी आणि मंगेश रासकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे आणि त्यांचे मित्र सुर्यवंशी व रासकर हे सुखसागरनगर येथून जात होते. त्यावेळी त्यांनी संकपाळ यांना ह्यतु विनाकारण माझ्या फेसबुकवर कमेंट का करीत असतोसह्ण अशी विचारणा केली. त्यामुळे चिडलेल्या संकपाळ, कदम आणि कामठे यांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सुर्यवंशी व रासकर यांनाही मारहाण करुन मोरे यांच्या हातातील महागडे घड्याळ तोडून नुकसान केल्याचे मोरे यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
तर, संकपाळ हे सुखसागरनगर येथील सिध्दी विनायक रुग्णालयामधून हेल्थ चेकअप करुन बाहेर आले होते. बुटाची लेस बांधत असताना मोरे व त्यांचे सहकारी तेथे गेले. मोरे यांनी संकपाळ यांना तु फेसबुकवर का लाईक करतोस, कमेंट का करतोस, तुझी लायकी नाही अशी विचारणा केली. त्यावर, ह्यतो माझा प्रश्न असून तुम्ही कोण विचारणारह्ण असे संकपाळ यांनी म्हणताच त्यांना तिघांनी मिळून हाताने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.