अश्लील मेसेज पाठविणारा मनसे नगरसेवक गजाआड

By Admin | Updated: February 10, 2017 05:15 IST2017-02-10T05:15:09+5:302017-02-10T05:15:09+5:30

चाराची रणधुमाळी सुरु असतानाच मतदारालाच अश्लील मेसेज पाठविणे मनसे नगरसेवक सुधीर जाधवला भलतेच महागात पडले आहे

MNS corporator Gazaad, who sent obscene messages | अश्लील मेसेज पाठविणारा मनसे नगरसेवक गजाआड

अश्लील मेसेज पाठविणारा मनसे नगरसेवक गजाआड

मुंबई : प्रचाराची रणधुमाळी सुरु असतानाच मतदारालाच अश्लील मेसेज पाठविणे मनसे नगरसेवक सुधीर जाधवला भलतेच महागात पडले आहे. गुरुवारी दादर पोलिसांनी त्याला विनयभंग आणि धमकावल्याच्या गुन्ह्यांत अटक केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र भोईवाडा न्यायालयाने त्यांना७ हजार रुपयांच्या जामिनावर सोडल्याने तुर्तास त्यांची सुटका झाली आहे.
दादर पश्चिमेकडे तक्रारदार ४१ वर्षीय महिला कुटुंबियांसोबत राहते. त्या वास्तुशास्त्रज्ञ आहेत. व्हॉटसअ‍ॅपवर ’तुझा डीपी सुंदर आहे, तुझा फुल फोटो पाठव, असे मॅसेज त्यांनी पाठविला. त्यास नकार दिला असता पहाटे ४ वाजेपर्यंत ते फोटोची मागणी व व्हॉटसअ‍ॅप कॉल करीत राहिल्याचे महिलेचे म्हणणे आहे. त्यानंतर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीने जाधव यांचे मॅसेज डिलीट करुन टाकण्याची धमकी दिली. जिवाला धोक असल्याच्या शक्यतेतून महिलेने ४ फेब्रुवारी तक्रार दाखल केली. अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परमजित दहिया यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: MNS corporator Gazaad, who sent obscene messages