शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा त्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना इशारावजा पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 14:17 IST

मनसे प्रमुख राज ठाकरेंची आक्रमक भूमिका; राज्य सरकारला सूचक इशारा

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात राज्यातल्या जनतेला वाढीव वीज बिलाचा सामना करावा लागत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना वीज बिलामुळे अनेकांचं कंबरडं मोडलं आहे. या प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी वीज कंपन्यांना सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खासगी वीज कंपन्यांनादेखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खासगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारी आणि खासगी वीज कंपन्यांनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलं पाठवली आहेत. राज ठाकरेंनी याच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. वीज कंपन्यांनी पाठवलेली बिलं म्हणजे ग्राहकांची लूट आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाची शाश्वती नसताना वाढीव वीज बिल पाठवणं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करण्यासारखं असल्याचं राज यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. कोरोनाची परिस्थिती अभूतपूर्व होती आणि त्यामुळे राज्यातील जनता, राजकीय पक्ष एकदिलानं सरकारच्या पाठिशी ठाम उभे राहिले आणि भविष्यातदेखील राहतील. पण या अशा विषयांत जनता आणि मनसे गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारनं करून घेऊ नये, असा सूचक इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.मुख्यमंत्र्यांनी या विषयात तातडीनं लक्ष घालून वीजबिलात तात्काळ सूट द्यावी तसंच ही सूट कोणत्याही प्रकारानं भविष्यात वसूल करायचा प्रयत्न करू नये. राज्य सरकारनं आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खासगी वीज कंपन्यांनादेखील कडक शब्दांत समज द्यायला हवी. अन्यथा या खासगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, अशी आक्रमक भूमिका राज यांनी घेतली आहे. विषय संवेदनशील आहे आणि सरकारदेखील संवेदनशीलपणे हा विषय हाताळेल याची खात्री असल्याचा विश्वास राज यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेelectricityवीज