मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. राज ठाकरे यांनी नंदनवन बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवेळी एकनाथ शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देत राज ठाकरे यांचं स्वागत केलं. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. मात्र ही भेट राजकीय होती की सदिच्छा भेट होती. याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
गेल्या महिन्यात झालेल्या मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजपा आणि शिंदेसेनेची महायुती अशी लढत झाली होती. तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली होती. मात्र पालिका निवडणुका आटोपल्यानंतर मनसेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदेसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. तसेच राज ठाकरे यांनीही लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पहिल्यांदाच भेट झाली आहे. तसेच या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे शिंदेसेनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र या भेटीमधील चर्चेचे अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.
एकीकडे पालिका निवडणुकीमध्ये उद्धवसेना आणि मनसे हे ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र आल्यानंतर ही युती एकत्र राहण्यासाठीच झाली आहे, असेही सांगण्यात येत होते. मात्र असं असतानाही उद्धवसेनेचा कट्टर विरोधक असलेली शिंदेसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याशी मनसे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या होत असलेल्या जवळीकीबाबत उद्धव ठाकरे आणि उद्धव सेना काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Web Summary : MNS chief Raj Thackeray met Deputy CM Eknath Shinde, fueling political buzz. Discussions occurred after recent municipal elections where MNS supported Shinde's faction in Kalyan Dombivli. The meeting's specifics remain undisclosed, leaving Uddhav Thackeray's reaction uncertain.
Web Summary : मनसे प्रमुख राज ठाकरे ने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात की, जिससे राजनीतिक चर्चा तेज हो गई। हाल के नगर निगम चुनावों के बाद चर्चा हुई, जहाँ मनसे ने कल्याण डोंबिवली में शिंदे गुट का समर्थन किया। बैठक का विवरण अभी तक अज्ञात है, जिससे उद्धव ठाकरे की प्रतिक्रिया अनिश्चित है।