शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'राज'पुत्र सक्रिय राजकारणात?; बाळासाहेबांच्या जयंतीला अमित ठाकरेंचा होणार 'उदय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 10:50 IST

मनसेला तरुण चेहरा देण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे राज्याच्या राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार असल्याची माहिती मिळत आहे. २३ जानेवारीला होणाऱ्या मनसेच्या अधिवेशनात अमित ठाकरेंचं अधिकृत लॉन्चिंग होणार असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. मनसेला तरुण चेहरा देण्यासाठी अमित ठाकरे राजकारणात सक्रिय होतील, असं सांगितलं जात आहे. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. त्याच दिवशी मनसेचं अधिवेशन होणार आहे. यामध्ये अमित ठाकरेंच्या लॉन्चिंगची घोषणा केली जाऊ शकते. याआधी अमित ठाकरेंनी काही आंदोलनांचं नेतृत्त्व केलं आहे. जवळपास दीड महिन्यापूर्वी अमित ठाकरेंनी नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या थाळीनाद मोर्चा काढला होता. याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अमित ठाकरेंनी नवी मुंबईत मोर्चाचं नेतृत्त्व केल्यानंतर ते लवकरच सक्रिय राजकारणात येतील, अशी चर्चा सुरू झाली होती. रेल्वेच्या प्रश्नांवरदेखील अमित ठाकरेंनी अनेकदा आवाज उठवला आहे. याशिवाय आरेतील मेट्रो कारशेडचा वाद तापला असताना त्यांनी आंदोलकांची भेटदेखील घेतली होती. गेल्या काही महिन्यांपासून ते मनसेच्या शाखांमध्ये जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेटीगाठीदेखील घेत आहेत. अमित ठाकरे अनेकदा राज ठाकरेंच्या सभांना उपस्थित राहिले आहेत. मात्र ते कायम व्यासपीठासमोरील भागात दिसले आहेत. मात्र २३ जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात ते पक्षाच्या व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे. २३ जानेवारीला होणारा मनसेचा मेळावा पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात कालच एक गुप्त भेट झाली असल्यानं मनसेच्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीत राज्यातील सध्याची राजकीय समीकरणं आणि भविष्यातील राजकीय गणितांवर चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना