शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:49 IST

या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला मनसेचे पदाधिकारी वगळता कुठल्याही प्रसार माध्यमांना आत प्रवेश दिला नाही. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीचा कानमंत्र दिल्याचं बोललं जात आहे. २० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग तुम्ही एकमेकांमध्ये का भांडता? असं विचारत राज यांनी कार्यकर्त्यांना मनपा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. 

या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विशेषत: मतदार यांद्यांवर लक्ष देण्याच्या सूचना राज यांनी केल्या आहेत. मतदार यादी तपासा, जुने कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन तुम्ही एकत्र काम केले पाहिजे. जर २० वर्षांनी आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो मग पदाधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये कुठलाही वाद घालू नका. कार्यकर्त्यांनी वाद न घालता एकत्रित निवडणुकीची तयारी केली पाहिजे. लोकांशी संपर्क वाढवण्यावर भर द्या अशा सूचनाही राज ठाकरेंनी दिल्या आहेत. जवळपास ३०-४० मिनिटे राज यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे.

तसेच या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवण्याबाबत काही संकेत दिले नाहीत. मात्र आपला मनसेचा कार्यकर्ता कसा पुढे जाईल. महापालिकेची तयारी कशी करेल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. परंतु २० वर्षांनी दोन भाऊ एकत्र येत असतील तर आपण एकमेकांमध्ये भांडण किंवा वाद करू नका असं विधान त्यांनी केले आहे. या मेळाव्यानंतर कुठल्याही पदाधिकाऱ्याला माध्यमांशी संवाद साधण्यास मनाई केली होती. याआधी युतीवर भाष्य करायचे नाही अशा सूचनाही पक्षाकडून सगळ्यांना देण्यात आल्या होत्या. 

दरम्यान, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. कार्यकर्त्यांनीही त्यांच्या सूचना हात वर करून मान्य केल्या आहेत. युतीबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. आपण एकमेकांना मानसन्मान दिला पाहिजे. आपण कसं वागतो, त्यावरही लक्ष दिले पाहिजे. माजी पदाधिकारी, उमेदवार होते, काही घरी बसलेले आहेत. तुम्हाला आवडत नाही, पटत नाही मात्र तो पक्षाचा कार्यकर्ता आपला आहे. तो कार्यकर्ता आपल्यासोबत घेतला पाहिजे. त्याला विश्वास दिला पाहिजे अशी सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना दिली.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरElectionनिवडणूक 2024