पनवेलमधील मनसे उमेदवार जखमी दुचाकीची धडक : प्रचारदरम्यान अपघात
By Admin | Updated: October 6, 2014 12:03 IST2014-10-06T04:50:43+5:302014-10-06T12:03:36+5:30
पनवेलमधील महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे उमेदवार केसरीनाथ पाटील हे शनिवारी प्रचारादरम्यान अपघात होऊन गंभीर जखमी झाले

पनवेलमधील मनसे उमेदवार जखमी दुचाकीची धडक : प्रचारदरम्यान अपघात
नवी मुंबई : पनवेलमधील महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे उमेदवार केसरीनाथ पाटील हे शनिवारी प्रचारादरम्यान अपघात होऊन गंभीर जखमी झाले. त्यांना बेलापूर येथील एमजीएम रु ग्णालय दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात खारघर येथे झाला. त्यात पाटील यांच्या कमरेला फ्रॅक्चर झाले आहे. मनसेने दसऱ्याच्या मुहूर्तावर पनवेल मतदारसंघातील महत्त्वाच्या अशा खारघर शहरामधून प्रचाराला सुरु वात केली, मात्र प्रचार करताना मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने पाटील यांना धडक दिल्याने ते जायबंदी झाले. त्यांना त्वरित एमजीएम येथे हलवण्यात आले.
या दुखापतीमुळे डॉक्टरांनी त्यांना सहा महिने आराम करण्याचा सल्ला दिला आहे, मात्र महत्त्वाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील, अशी आशा केसरीनाथ पाटील यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)