शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:03 IST

राजकारणात परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो. भविष्यात काय परिस्थिती असेल दोन मित्र एकमेकांच्या पक्षाबद्दल, भूमिकेबद्दल काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. जवळपास दीड ते २ तास या दोन्ही नेत्यांनी बैठक पार पडली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, संदीप देशपांडे उपस्थित होते. राज-फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे-भाजपा युतीबाबत पुन्हा चर्चेला उधाण आलं. त्यात भविष्यकाळात राजकारणात काहीही होऊ शकतं अशाप्रकारे सूचक संकेत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहेत. 

भेटीनंतर बाळा नांदगावरकर म्हणाले की, मध्यंतरी राज ठाकरेंनीदेवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं होतं. ते पत्र सगळ्यांनाच आवडलं होतं. त्या पत्रानंतर फोनवरून दोन्ही नेत्यांचे बोलणं झाले होते. त्यानंतर आज ते सदिच्छा भेट घेण्यासाठी शिवतीर्थवर आले होते. १५-२० मिनिटं आम्ही दोन्ही नेत्यांसोबत होतो. या दोन्ही नेत्यांमधील चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कळू शकेल. मंत्रिमंडळातील समावेशाबाबत आम्ही माध्यमांकडूनच ऐकतो आहे. अमित ठाकरेंना मंत्रिमंडळात घेणार यावर राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. अशाप्रकारे वृत्त खोटं आहे. ही खोडसाळपणाचं होतं असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत सरकारमध्ये समावेश असण्याचा आमचा संबंध नाही. आम्ही तशी काही मागणी केली नाही. पण दोघांमध्ये चर्चा झाली असेल तर माहिती नाही. राजकारणात परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो. भविष्यात काय परिस्थिती असेल दोन मित्र एकमेकांच्या पक्षाबद्दल, भूमिकेबद्दल काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. मनसे-भाजपा युतीबाबत अनुत्तरीत आहे. सध्या निवडणुका नाहीत त्यामुळे भाष्य करू शकत नाही. सध्या राष्ट्रपती निवडणुका आहेत त्यात आमचं एकमत आहे. भाजपाला मदत करण्याची भूमिका मनसेने घेतली. आता त्याबदल्यात काय करायचे हे त्यांच्या पक्षाचं धोरण असेल. कुठल्याही मोबदल्यासाठी राज ठाकरे निर्णय घेत नाहीत. आता मनसेला सकारात्मक वातावरण आहे. लोकांमध्ये सगळ्याच पक्षांबद्दल अविश्वास निर्माण होत आहे. आमचा एकला चलो रे नारा आज, उद्याही राहणार आहेत. पण भविष्यात नक्की काय होईल हे आत्ताच सांगता येत नाही असंही बाळा नांदगावकरांनी सांगितले. 

तसेच राजकारणात काहीही अशक्य आहे. पुढील निवडणुकीत काय होईल सांगता येत नाही. महाविकास आघाडी बनेल असंही वाटलं नव्हतं. त्यानंतर आता अशाप्रकारे सरकार बनेल असंही वाटलं नाही. लोकं सगळं काही बघत आहे. जनतेचा कौल डावलून आधीच सरकार बनलं होतं. येणारा काळ मनसेसाठी सुवर्णकाळ ठरेल असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसेBala Nandgaonkarबाळा नांदगावकर