शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

Maharashtra Politics: कोणाचा दसरा मेळावा पाहिला? शिंदे गटाचा की उद्धव ठाकरेंचा? अमित ठाकरे म्हणाले, “मी तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 12:51 IST

Maharashtra Politics: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नव्या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. यावेळी अमित ठाकरेंना दसरा मेळाव्याबाबत विचारण्यात आले.

Maharashtra Politics: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. मात्र, यानंतर राजकीय घमासानही झाल्याचे पाहायला मिळाले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे दिसले. यातच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना कोणाचा दसरा मेळावा पाहिला, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अमित ठाकरेंनी केवळ एका वाक्यात सडेतोड उत्तर दिले.  

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नव्या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत अमित ठाकरे मराठवाडा महासंपर्क अभियान राबवत आहेत. यावेळी अमित ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. अमित ठाकरे यांना दसरा मेळाव्याबाबत विचारणा करण्यात आली. तुम्ही कोणाचा दसरा मेळावा पाहिला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की, उद्धव ठाकरे यांचा पाहिला, यावर अमित ठाकरेंनी लगेचच अगदी थोडक्यात उत्तर दिले. 

मी कोणताही दसरा मेळावा पहिला नाही

मी कोणताहीच दसरा मेळावा पहिला नाही, असे अमित ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच मराठवाडा संपर्क अभियानाबाबत अमित ठाकरे यांनी माहिती दिली. मनसे विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी हा दौरा आहे. गणेशोत्सव नवरात्रीमुळे तो थांबलेला होता मात्र आता तो पुन्हा सुरू केलाय. ज्यांना विद्यार्थी सेनेत काम करायचे आहे. अशा नवीन विद्यार्थ्यांना तरुण-तरुणींना भेटणार आहे. विद्यार्थी सेनेचा आढावा घेणार आहे. त्यानंतर मनसेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन राजसाहेबांपर्यंत पोहोचवणार आहे, असे अमित ठाकरे म्हणालेत.

दरम्यान, दसरा मेळाव्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “नुसतीच ‘उणी’ ‘धुणी’ ‘नळ’ आणि ‘भांडण’; विचार ही नाही आणि सोनं ही नाही, असे ट्वीट देशपांडे यांनी केले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ ट्विट करत संदीप देशपांडे यांनी भूतकाळ कधीच पिच्छा सोडत नसतो. बरोबर ना उद्धवजी, असा सवाल करत, बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असे म्हणत टोला लगावला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे